Breaking
ब्रेकिंग

देशभक्तीपर गीतांनी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा म्युझिक लव्हर्स ग्रुपचा उल्लेखनीय उपक्रम

0 7 6 9 4 3

देशभक्तीपर गीतांनी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

म्युझिक लव्हर्स ग्रुपचा उल्लेखनीय उपक्रम

एस डब्ल्यू न्यूज नेटवर्क

अहिल्यानगर : दि . २७ / म्युझीक लव्हर्स ग्रुप , ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य ,नगर आणि नमो फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि . २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिन निमित्ताने देशभक्ती पर गीतांचा कार्यक्रम मार्केट यार्ड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे शेतकरी निवास यांच्या सहकार्याने मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला. म्युझिक लव्हर्स ग्रुप मार्फत विविध गाजलेली सुप्रसिद्ध देशभक्तीपर गाणी सादर करण्यात आली . देशभक्तीवरील गीत सादर करण्याचे म्युझिक लव्हर्स ग्रुपचे यंदाचे तिसरे वर्ष आहे .
हा उपक्रम दरवर्षी अखंड अविरत चालु ठेवण्याचा मानस असल्याचे ग्रुपच्या वतीने सांगण्यात आले .

श्री . शिरिष बेगडे ,विनय गुंदेचा, पंढरीनाथ लांडगे, मनिष मुथ्था, संजय वायकर , किशोर बनसोडे, राजु क्षेत्रे, किरण वैकर, संतोष सुर्यवंशी हेमंत डहाळे , आशिश खत्री या गायकांनी मराठी व हिंदी गीते गायली . महंमद रफी, मुकेश, उदित नारायण, महेंद्र कपूर, रुपकुमार राठोड, हेमंत कुमार, अरिजीत सिंग अशा अनेक प्रसिद्ध गायकांची गाणी सादर करण्यात आली .जहाँ डाल डाल पर, छोडो कल की बाते , ओ देश मेरे , संदेसे आते है , मेरे देश प्रेमियों, मेरा कर्मा तु , फिर भी दिल है हिंदुस्तानी अशी विविध गाणी सादर केली .

आपल्या देशाचे उज्वल भविष्य असणाऱ्या लहान मुलांनी जन गन मन या राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता केली . श्री .किरण वैकर यांनी सुत्रसंचालन केले तर श्री . शिरिष बेगडे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले .यावेळी अनेक महिला व नागरिक मान्यवर रसिक उपस्थित होते . सर्व संगीतप्रेमी रसिकांचा उल्लेखनीय प्रतिसाद मिळाला .

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे