Breaking
ब्रेकिंग

खासदार स्मिताताई वाघ यांनी बस स्थानकाच्या विकासासाठी २५० लक्ष रुपयांची कामे मंजूर केली

0 7 6 9 4 3

खासदार स्मिताताई वाघ यांनी बस स्थानकाच्या विकासासाठी २५० लक्ष रुपयांची कामे मंजूर केली

प्रतिनिधी :- पंकज पाटील

अमळनेर :- दि. १८ फेब्रुवारी २०२६ / जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार स्मिताताई वाघ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा व प्रभावी प्रयत्नांमुळे अमळनेर येथील बस स्थानकाच्या सुशोभीकरण व सुविधा विस्तारासाठी २५० लक्ष रुपये इतक्या भरीव निधीच्या विकासकामांना मंजुरी मिळाली आहे. या मंजुरीमुळे अमळनेर बस स्थानकाचा चेहरा-मोहरा पूर्णतः बदलणार असून, स्थानक स्वच्छ, सुंदर आणि प्रवाशांसाठी अधिक सुविधायुक्त होणार आहे. या प्रकल्पांतर्गत बस स्थानक परिसराचे संपूर्ण काँक्रिटीकरण, जलनिचरा (गटार व्यवस्था) सुधारणे, सुशोभीकरणासाठी पेव्हर ब्लॉक बसविणे, रंगकाम तसेच इतर आवश्यक विकासकामे करण्यात येणार आहेत.

या कामांमुळे बस स्थानक अधिक आकर्षक व स्वच्छ दिसणार असून, दररोज ये-जा करणाऱ्या हजारो प्रवाशांना अधिक सोयी-सुविधा उपलब्ध होतील .
अमळनेरच्या जनतेसाठी ही एक मोठी भेट आहे. अमळनेर हे जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर असून येथील बस स्थानकातून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. स्थानकाची सद्यस्थिती सुधारण्याची नितांत गरज होती. या विकासकामांमुळे प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळणार असून शहराच्या सौंदर्यातही भर पडेल.”
या विकासकामांच्या मंजुरीबाबत खासदार स्मिताताई वाघ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक तसेच जलसंपदा मंत्री गिरीशजी महाजन यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

खासदारांच्या या यशस्वी प्रयत्नांमुळे अमळनेर बस स्थानकाचा सर्वांगीण विकास होणार असल्याने स्थानिक नागरिक व प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. सदर विकासकामांची अंमलबजावणी लवकरात लवकर सुरू होऊन ती निर्धारित कालावधीत पूर्ण केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे