Breaking
ब्रेकिंग

फॅन्सी ड्रेस स्पर्धेमुळे मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना : उपवनसंरक्षक – धर्मवीर सालविठ्ठल

स्नेहबंधच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे पारितोषिक वितरण

0 7 6 9 5 2

फॅन्सी ड्रेस स्पर्धेमुळे मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळते : उपवनसंरक्षक – धर्मवीर सालविठ्ठल

स्नेहबंधच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे पारितोषिक वितरण

प्रतिनिधी : संवेद वायकर

अहिल्यानगर |  नवरात्रीनिमित्त स्नेहबंध सोशल फौंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय फॅन्सी ड्रेस स्पर्धेमुळे मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळतो, शिवाय त्यांच्यात स्टेज डेरींगही येते. ही स्पर्धा म्हणजे स्तुत्य उपक्रम आहे, असे प्रतिपादन उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी केले. स्नेहबंध सोशल फौंडेशनच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय फॅन्सी ड्रेस स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी स्नेहबंधचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे, सेवानिवृत्त माजी प्राचार्य एकनाथ जगताप, सोमेश्वर आव्हाड, विलास बिडवे, पत्रकार संजय सावंत, पियूष शिंदे, स्वयंम बास्कर, अंकुश गोत्राळ, प्रथमेश राठोड आदी उपस्थित होते. 

उपवनसंरक्षक सालविठ्ठल म्हणाले, मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. शिंदे यांनी ही स्पर्धा आयोजित केली. त्यांच्या हा उपक्रम चांगला आहे. यामुळे मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळतो. ही स्पर्धा म्हणजे मुलांसाठी भविष्यात एखाद्या मोठ्या संधीचा पाया आहे.

डॉ. उद्धव शिंदे म्हणाले, स्नेहबंधच्या वतीने दरवर्षी मुलांसाठी किल्ले बनवा, निबंध स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या सर्वच स्पर्धांना मुलांचा मोठा प्रतिसाद मिळतो. या स्पर्धेमधून उद्याचा कलावंत, लेखक घडवा, अशी अपेक्षा आहे. या स्पर्धेतील मुलांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व डायरीचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविक व आभार सेवानिवृत्त माजी प्राचार्य एकनाथ जगताप यांनी मानले.

 फॅन्सी ड्रेस स्पर्धेतील विजेते
 गट- १ ते ५ वर्षे : प्रथम- शरण्या शुभम नांगरे, द्वितीय : हितार्थ सौरभ शिंदे, तृतीय अव्दैत शुभम बिडवे. गट ५ ते १२ वर्षे : प्रथम : लक्ष्मी प्रकाश लोखंडे, द्वितीय : शिवांश अतुल खामकर, तृतीय : मनंश महेश आळकुटे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 5 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे