“ती” सॅनिटरी पॅड बॅक फाऊंडेशन तर्फे पूरग्रस्त भागातील महिलांना सॅनिटरी पॅड चे वितरण
“ती” सॅनिटरी पॅड बॅक फाऊंडेशन तर्फे पूरग्रस्त भागातील महिलांना सॅनिटरी पॅड चे वितरण
प्रतिनिधी: सूर्यकांत होनप
करमाळा: दि. ०९/ मुंबईतील भाजपच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर यांच्या “ती” सॅनिटरी पॅड बॅक फाउंडेशन च्या वतीने करमाळा व माढा तालुक्यात आलेल्या सीना नदीच्या पूरग्रस्त कुटुंबातील महिला व मुलींना अत्यंत आवश्यक असणाऱ्या सॅनिटरी पॅडचे वितरण करण्यात आले आहे. सीना काठच्या शेकडो पूरग्रस्त महिलांना त्यांच्या मासिक काळातील अडचणींना तोंड देता यावे म्हणून त्यांनी हजारो सेनेटरी पॅडचे वितरण करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्याकडे वितरनं करण्यासाठी दिले आहेत.
यावेळी या फाउंडेशनचे सुदेश रासकर तसेच करमाळातील करमाळा तहसीलचे नायब तहसीलदार तथा पुरवठा निरीक्षण अधिकारी शत्रुघ्न चव्हाण, निशांत खारगे, शब्बीर मुलाणी, संतोष पोद्दार आदी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
करमाळा तहसील कार्यालय येथे मुंबईतुन “ती” सॅनिटरी पॅड बॅक फाऊंडेशन, अध्यक्षा डॉ. भारती लव्हेकर यांच्या कडून पूरग्रस्त मुली महिला यांच्या साठी हे पॅड पाठवले आहेत. यानंतरही अजून लवकरच सॅनिटरी पॅड पाठवले जाणार आहेत अशी माहिती समन्वयक सुदेश रासकर यांनी सांगितले. करमाळा, माढा तालुक्यातील शाळामधील मुलींना देखील डॉ. भारती लव्हेकर यांनी सॅनिटरी पॅड पाठवले आहेत. पुरगस्तासाठी इतर मदतीसाठी देखील स्वतः डॉ. भारती व करमाळ्याचे सुदेश रासकर हे देखील मुंबईहून करमाळा , माढा तालुक्यातील शेतकरी अन्नदाता पुरगस्तासाठी मदत करत आहेत.
माढा तालुक्यातील नगराध्यक्ष मिनल साठे, कुर्डुवाडी येथील नगरसेविका विनिता सातव यांच्याकडेही आमदार डॉ. भारती लव्हेकर यांच्या कडून पुरगस्त मुली, महिला यांच्यासाठी पॅड पाठवले आहेत अशी माहिती सुदेश रासकर यांनी दिली आहे.
महिलांसाठी सॅनेटरी पॅडची मदत हे गरजेचे आहे याचे भान “ती” फाउंडेशन ने ठेवले आहे हे कौतुकस्पद आहे. महिलांच्या अनेक अडचणी बरोबर या आवश्यक अडचणी व परिणामाकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. याचीच दखल या “ती” फाउंडेशनच्या अध्यक्षा व आमदार भारती लव्हेकर यांनी घेतलेली आहे याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
शिल्पा ठोकडे, तहसीलदार, करमाळा
सीना काठच्या शेकडो पूरग्रस्त कुटुंब विस्थापित झाले आहेत. या कुटुंबातील महिलांना कौटुंबिक व प्रापंचिक अडचणीला तोड देता देता त्यांच्या मासिक पाळीतील अडचणीचा मोठा सामना त्यांना करावा लागत आहे. त्यांचे जीवन पूर्वपदावर यावे व त्यांना सर्व व्यवहार सुसह्य करता यावे यासाठी त्यांना आमच्या फाउंडेशन कडून सॅनेटरी पॅडचे वाटप करण्यात येत आहे. यानंतरही शाळेतील व महाविद्यालयातील विद्यार्थिनींना आम्ही सॅनेटरी पॅडचे वापराचे महत्व सांगून त्याचे वितरण लवकरच करू.
डॉ. भारती लव्हेकर, आमदार, अध्यक्षा, “ती” सॅनेटरी पॅड फाउंडेशन, मुंबई.



