Breaking
ब्रेकिंग

राहुरी तालुक्यातील खडांबे येथे खळबळ जनक घटना चक्क कबरीतील मानवी सापळयाची चोरी.

0 4 3 3 7 0

राहुरी तालुक्यातील खडांबे येथे खळबळ जनक घटना चक्क कबरीतील मानवी सापळयाची चोरी..

राहुरी तालुका जावेद शेख

राहुरी तालुक्यातील खडांबे खुर्द येथे एक खळबळ जनक घटना समोर आली. येथील आदिवासी दफनभूमीत पोयटा बरोबर आदिवासींच्या कबरीतील मानवी सापळे चोरुन नेल्याची घटना घडली. या घटनेमुळे आदिवासी समाजातून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
राहुरी तालुक्यातील खडांबे खुर्द गावातील आदिवासींच्या दफनभूमीतील पोयटा चोरून नेत असताना एक जेसीबी तसेच एक चार ब्रासचा ढंपर रात्री एकच्या सुमारास गावातील आदिवासी तसेच गावातील नागरीकांनी जप्त करून महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्या स्वाधीन केला आहे. हा खळबळजनक प्रकार जनतेच्या सतर्कतेने तसेच लोक नियुक्त सरपंच अन्ना माळी यांनी उघड आणल्याने अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. अवैध उत्खनन करणाऱ्या माफीयांनी आता आपला मोर्चा आदिवासी समाजाच्या दफनभूमीवर वळविल्याने या ठिकाणी दफन करण्यात आलेल्या व्यक्तींची अवशेष पोयट्या बरोबर बरोबर चोरुन नेले आहेत. त्यामुळे आदिवासी समाज हा पेटून उठला आहे. मृतांच्या थडग्यावर अन्याय होत असताना तालुक्याचे माजी मंत्री यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आदिवासी समाजाच्या दफनभूमी मध्ये अवैधरित्या पोयटा उत्खनन करणाऱ्या भगवान कल्हापूरे या व्यक्तीवर व त्याच्या वाहनांवर आदिवासी ॲक्ट- ॲट्रोसिटी तसेच वन, पोलिस, महसूल पर्यावरण या अंतर्गत त्वरीत गुन्हे दाखल करुन माफियांना जेरबंद करावे. आणि आदिवासी समाजाला न्याय द्यावा. अशा सुचना माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी तहसिलदार नामदेव पाटील तसेच पोलिस निरिक्षक संजय ठेंगे यांना केल्या.
यावेळी घटनास्थळी आदिवासी समाज व गावातील नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. यामागे अनेक वेळा त्या गुन्हेगारांवर अवैध गौन खनिज चोरी प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. भगवान कल्हापूरे याने मानुसकीच्या नावाला काळीमा फासला असून अशा गुन्हेगारावर त्वरीत कार्यवाही करून त्याला शिक्षा व्हावी. अशी मागणी लोकनियुक्त सरपंच व नागरिकांनी केली आहे. प्रशासन यावर काय कार्यवाही करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 3 7 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे