अमळनेर शहरात डासांचा कहर; नागरिक हैराण,प्रशासन आणि नगरपालिका मात्र ‘गाढ झोपेत’?
सार्वजनिक ठिकाणी डासांचा वाढता उपद्रव; डेंगू-मलेरियाचा धोका वाढला, तातडीने उपाययोजनांची मागणी

अमळनेर शहरात डासांचा कहर; नागरिक हैराण,प्रशासन आणि नगरपालिका मात्र ‘गाढ झोपेत’?
सार्वजनिक ठिकाणी डासांचा वाढता उपद्रव; डेंगू-मलेरियाचा धोका वाढला, तातडीने उपाययोजनांची मागणी
जळगाव जिल्हा प्रतिनिधी :- पंकज पाटील
अमळनेर :- अमळनेर शहरात सध्या डासांचा उपद्रव प्रचंड वाढला असून नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. सार्वजनिक ठिकाणे, कॉलनी परिसरातील मोकळ्या जागा तसेच गल्लीबोळांमध्ये मोठ्या प्रमाणावर डासांची उत्पत्ती होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
विशेष म्हणजे, डास नियंत्रणासाठी आवश्यक असलेली फॉगिंग मशीनद्वारे फवारणी किंवा इतर उपाययोजना शहरात होताना दिसत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.सत्ताधारी आणि विरोधक यांच्या राजकीय कलगीतुऱ्यात सामान्य नागरिक मात्र होरपडत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे आणि सकाळ-सायंकाळ तसेच रात्री डासांचा प्रादुर्भाव अधिकच वाढला आहे. मोकळ्या जागांमधून डास थेट घरांमध्ये शिरत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.यामुळे डेंगूआणि मलेरिया सारख्या जीवघेण्या आजारांचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सामाजिक कार्यकर्ते डी.ए. धनगर यांनी याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. “नागरिकांचे पालकत्व स्वीकारणाऱ्या जबाबदार यंत्रणांनी वेळीच पावले उचलली नाहीत, तर परिस्थिती अधिक बिकट होऊ शकते,” असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, वारंवार सूचना देऊनही नगरपालिकेकडून ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.मागणी काय?
शहरात तात्काळ फॉगिंग मोहीम राबवावी
डासांच्या उत्पत्तीस्थळांची स्वच्छता करावी
नियमित फवारणी व नियंत्रण उपाययोजना सुरू कराव्यात.नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता, नगरपालिकेने त्वरित पावले उचलून शहरवासीयांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे.



