Breaking
ब्रेकिंग

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत जिल्हास्तरावर अकोले तालुक्यातील शिक्षकांचे यश

श्रीमती. स्मिता धनवटे व श्री. सदानंद चव्हाण यांचे नवोपक्रम राज्यस्तरासाठी पात्र

0 3 9 1 0 5

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत जिल्हास्तरावर अकोले तालुक्यातील शिक्षकांचे यश

श्रीमती. स्मिता धनवटे व श्री. सदानंद चव्हाण यांचे नवोपक्रम राज्यस्तरासाठी पात्र

राहुरी वृत्तसेवा / प्रतिनिधी : जावेद शेख

शाळेतील विद्यार्थ्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी व गुणवत्ता वाढीसाठी शिक्षक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित असतात. अशा शिक्षकांच्या कल्पकतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचे मार्फत आयोजित केली जाते.
जिल्हा स्तरावर स्पर्धेचे आयोजन व मूल्यांकन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर मार्फत करण्यात आले. या वर्षी अहिल्यानगर जिल्ह्यातून प्राथमिक शिक्षक गटामध्ये एकूण 21 नवोपक्रम सादर करण्यात आले होते.त्या पैकी 7 नवोपक्रम जिल्हास्तरासाठी निवडण्यात आले होते. या सात नवोपक्रमांपैकी तीन नवोपक्रम अकोले तालुक्यातील शिक्षकांचे होते हे विशेष कौतुकास्पद आहे. त्यामध्ये श्री सदानंद चव्हाण, श्री. हरिबा चौधरी व श्रीमती. स्मिता धनवटे यांच्या नवोपक्रमांचा समावेश होता.
स्पर्धा एकूण पाच गटात आयोजित करण्यात आली होती त्यापैंकी जिल्हास्तरावरील प्रथम पाच क्रमांकांची निवड राज्यस्तरासाठी करण्यात आली.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे -प्राथमिक शिक्षक गट – प्रथम क्रमांक- श्रीमती. स्मिता सुधाकर धनवटे (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठाकरवाडी, तालुका अकोले) नवोपक्रम – घेऊ स्पर्शाचे ज्ञान राहू अन्यायापासून लांब, द्वितीय क्रमांक – श्री.अभिजित राजेंद्र दळवी (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळगाव तालुका – श्रीगोंदा ) नवोपक्रम – मोबाईल बाबांचा, अभ्यास माझा, तृतीय क्रमांक – श्री.श्रीनिवास भूमराज एल्लाराम (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मठपिंपरी तालुका – अहिल्यानगर) नवोपक्रम – नवा व्यापार चतुर्थ क्रमांक – श्रीमती संजना भगवंत चेमटे (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यशवंतनगर तालुका – अहिल्यानगर) नवोपक्रम – ग्रंथालयाचा ध्यास धरू,
वाचन संस्कृती विकसित करू, पाचवा क्रमांक – श्री.सदानंद संपत चव्हाण
(जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कातळापूर तालुका – अकोले)
नवोपक्रम – चला, लैंगिक शोषणाविषयी जागृत होऊ या.
उत्तेजनार्थ क्रमांक – श्री.हरिबा लक्ष्मण चौधरी(जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरकुटे तालुका – अकोले )नवोपक्रम – ग्रंथ हेच गुरु, तयांचा हात धरू, उत्तेजनार्थ क्रमांक –
श्रीमती चंदना हौसराव सोनवणे (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वंजारवाडी) नवोपक्रम – अभिवाचन अभिजात मराठी साहित्याचे.
माध्यमिक शिक्षक गट- प्रथम क्रमांक-श्री. रामू सीताराम जाधव (जनता विद्यालय काष्टी तालुका श्रीगोंदा) नवोपक्रम – शाळा तेथे शिक्षण, विद्यार्थी तेथे सृजन, द्वितीय क्रमांक- श्रीमती परवीन फैसल खान, अहमदनगर उर्दू हायस्कूल ,अहिल्या नगर) Empowerment of students and young minds through hydration.

सर्व यशस्वी स्पर्धकांना जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.राजेश बनकर यांचे हस्ते पारितोषिक देण्यात आले. याप्रसंगी वरिष्ठ अधिव्याख्याता मा.अरुण भांगरे, मा.लक्ष्मण सुपे,विभागप्रमुख मा.गणेश मोरे, अधिव्याख्याता मा.रामेश्वर लोटके , मा.कैलास सदगीर ,मा.ज्योती निंबाळकर, मा.मुकुंद दहिफळे ,पर्यवेक्षक प्रा. सविता घुले, प्रा.चंद्रकला सापनर हे उपस्थित होते.

अकोले तालुक्यातील सहभागी व यशस्वी शिक्षकांचे तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा. श्री. अभयकुमार वाव्हळ, विस्तार अधिकारी श्रीम.सविता कचरे केंद्र प्रमुख श्री.तुकाराम एखंडे यांनी अभिनंदन केले आहे. यशस्वी शिक्षकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अकोले तालुका क्रीडा समिती अध्यक्ष श्री. किरण चौधरी सर यांनी देखील यशस्वी शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 1 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे