नशा मुक्त भारत व सशक्त भारत अभियान चे प्रशिक्षक व ब्रँड अँबेसेडर महेश वैद्य यांचा पद्मश्री जगविख्यात भजन सम्राट श्री अनुप जलोटाजी यांच्या हस्ते सन्मान

नशा मुक्त भारत व सशक्त भारत अभियान चे प्रशिक्षक व ब्रँड अँबेसेडर महेश वैद्य यांचा पद्मश्री जगविख्यात भजन सम्राट श्री अनुप जलोटाजी यांच्या हस्ते सन्मान
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. ३०/ करमाळा येथील रहिवासी असलेले नशा मुक्त अभियान व सशक्त भारत चे प्रशिक्षक व ब्रँड अँबेसेडर महेश वैद्य यांचा पद्मश्री जगविख्यात भजन सम्राट श्री अनुप जलोटाजी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. पद्मश्री भजन सम्राट श्री अनुप जलोटा यांनी महेश वैद्य यांनी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल त्यांचा सन्मान केला.
भजन सम्राट श्री अनुप जलोटाजी यांनी महेश वैद्य जे सामाजिक कार्य करत आहेत नशा मुक्त भारत आणि सशक्त भारत हे युवकांच्या दृष्टीने अतिशय सकारात्मक परिणाम करणारे आहे आणि त्यासाठी या सामाजिक उपक्रमास आपण सहकार्य करणार आहोत असे अनुप जलोटाजी यांनी महेश वैद्य यांच्या सत्कार प्रसंगी सांगितले. यासाठी लवकरच आपण मुंबई मध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करणार असल्याचे अनुप जलोटाजी यांनी सांगितले. शाहरुख खान, कपिल शर्मा सारखे दिग्गज या उपक्रमास चालना देण्यासाठी येतील असे मत श्री अनुप जलोटाजी यांनी महेश वैद्य यांच्या सोबत बोलताना व्यक्त केले. हा सामाजिक उपक्रम व्यापक स्वरूपात यशस्वीरित्या राबविण्यासाठी सर्व प्रकारची मदत, सहकार्य करणार असल्याचे भजन सम्राट श्री अनुप जलोटाजी यांनी महेश वैद्य यांच्या कामाचा गौरव करताना व्यक्त केले.
शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना फिटनेस बद्दल आवड निर्माण करून नशे पासून दूर कसे राहावे याबद्दल मार्गदर्शन करून महेश वैद्य जे काम करतात हे देशातील युवकांसाठी प्रेरनादायी आहे अशी भावना श्री अनुप जलोटाजी यांनी व्यक्त केली.
जग विख्यात भजन सम्राट पद्मश्री अनुप जलोटाजी यांचे महेश वैद्य यांनी खूप खूप आभार मानले आणि श्री अनुप जलोटाजी सर यांनी केलेल्या कौतुका मुळे आपल्याला अधिक काम करण्याची ऊर्जा द्विगुणीत झाली आहे असे महेश वैद्य यांनी सांगितले. अनुपजी यांनी आपल्या कामाबद्दल जी माहिती घेतली आणि भविष्यात कोणत्याही प्रकारचे सहकार्य करणार आहेत त्यामुळे आणखीनच व्यापक स्वरूपात यशस्वीरित्या नशामुक्त भारत आणि सशक्त भारत अभियानचे काम करत ग्रामीण भागापासून ते शहरी भागा पर्यंत हा अभियान राबवू असा विश्वास अनुपजी यांना महेश वैद्य यांनी आभार व्यक्त करताना दिला. हे सामाजिक उपक्रम कसे राबवायचे याबद्दल सर्व आराखडा करण्याच्या सूचना अनुपजी यांनी दिल्या आहेत आणि लवकरच आराखडा तयार करून अनुपजी यांना सादर करू असे महेश वैद्य यांनी सांगितले. या निमित्ताने अनुप जलोटाजी यांना भेटण्याचा योग आला आणि तो किती समजून घेतात प्रेरणा देतात यामुळे मन भारावून गेले. अशातच अनुप जी यांचे पुत्र श्री आर्यमन याची ओळख अनुप जी यांनी करून दिली आर्यमन हे सध्या अमेरिकेत स्थाईक आहेत त्यांनाही पाहण्याचा योग आला. यावेळी अनुपजी यांचे स्वीय सहायक श्री संजय शागलो ही उपस्थित होते. महेश वैद्य यांनी सर्वांचे आभार मानले. ही भेट अनुप जलोटाजी यांच्या निसर्गरम्य निवासस्थानी दादर येथे संपन्न झाली.
महेश वैद्य यांच्या सशक्त भारत व नशा मुक्त भारत अभियानाच्या या कार्याने त्यांचेच नव्हे तर करमाळा शहराचे नावही महाराष्ट्र नव्हे तर भारतभर गाजत आहे.