Breaking
ब्रेकिंग

सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ. आशा प्रकाश पाटील यांचा विद्याभूषण पुरस्काराने गौरव

0 3 9 0 3 6

सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ. आशा प्रकाश पाटील यांचा विद्याभूषण पुरस्काराने गौरव

प्रतिनिधी :- पंकज पाटील

धुळे :- देवपूर येथील कमलाबाई अजमेरा महिला महाविद्यालयात संपन्न झालेल्या १० व्या अखिल नारती मराठी साहित्य संमेलनात सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ. आशा प्रकाश प्रकाश पाटील यांना विद्याभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. शहराचे नामदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.देवपूर येथील वेस्ट खान्देश भगिनी सेवा मंडळ कला व वाणिज्य महिला महाविद्यालय व अखिल नारतीय मराठी साहित्य मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १०वे अखिल भारतीय मराठी नाहित्य संमेलन धुळ्यातील देवपूर भागात असलेल्या कमलाबाई अजमेरा साहित्य नगरी येथे रविवारी रोजी संपन्न झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ लेख समाजसेवक शशिकांत भदाणे तर स्वागताध्यक्ष स्मिता अतुल अजमेरा, मावळते संमेलनाध्यक्ष पुरुषोत्तम कृष्णाजी बारसावडे हे होते.साहित्य संमेलनात ‘मराठी साहित्य विश्वाचे बदलते स्वरूप’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. तसेच कविता वाचन करण्यात आले. यावेळी धुळ्यातील जिल्हा परिषदेतील शाळेतील सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ. आशा प्रकाश पाटील यांना विद्याभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 3 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे