Breaking
ब्रेकिंग

प्रसिद्ध वृत्त निवेदिका ज्योती आंबेकर यांची ज्ञानसंपदा शाळेत कार्यशाळा

0 3 9 0 8 1

प्रसिद्ध वृत्त निवेदिका ज्योती आंबेकर यांची ज्ञानसंपदा शाळेत कार्यशाळा

प्रतिनिधी : आसावरी वायकर

नगरः    संचालक व संपादक आपल्या भेटीला या सदरात दूरदर्शनच्या माजी संचालिका व प्रसिद्ध
वृत्तनिवेदिका ज्योती आंबेकर यांनी विद्यार्थ्यांशी मुलाखती द्वारे संवाद साधला. त्यांनी आपला वृत्त निवेदिका होण्याचा प्रवास सांगताना त्यामागील प्रचंड मेहनत, कष्ट, सातत्य, नाविन्याची ओढ या गुणांचा फायदा झाला हे सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना संवादाची तंत्रे, आवाजाचा व्यायाम, शब्दोच्चार, शब्दसंचय वाढण्यासाठी अवांतर वाचन, याचे महत्त्व पटवून दिले. उत्कृष्ट मुलाखतकार तसेच निवेदक, सूत्रसंचालक होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गुणांविषयी मार्गदर्शन केले. मुलाखतीचे नियम सांगताना उभे कसे रहावे, माईक कसा धरावा, देहबोली कशी असावी, नजर चौफेर कशी असावी, प्रश्नांची गुंफण कशी करावी इत्यादी विषयी सांगितले. इ.८ वी व इ ९वी च्या विद्यार्थ्यांनी विविध प्रश्नांद्वारे हसत खेळत संवाद कौशल्य आत्मसात केले.

दुसऱ्या सत्रात शिक्षकांसाठी संभाषण कौशल्य व व्यक्तिमत्व विकास या विषयावर आधारित कार्यशाळेचे आयोजन केले होते. यामधे शिक्षकांचे संभाषण कौशल्य अधिक विकसित करण्यासाठी शब्दांचे उच्चार, आवाजाचा व्यायाम, शब्दसंग्रह, उच्चार याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. उपक्रम घेऊन प्रत्यक्ष मार्गदर्शन केले. संभाषणासाठी छोट्या नाटिका, आवाजाच्या व्यायामासाठी काही कविता, गाणी यांचे प्रत्यक्ष शिक्षकांनी सादरीकरण करून आपला व्यक्तिमत्व विकास कसा साधता येईल याचे विविध धडे, तंत्रे, क्लुप्त्या ज्योती आंबेकर यांच्या या कार्यशाळेत शिक्षकांना अनुभवावयास मिळाले. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शिवांजली अकोलकर व सर्व शिक्षक वृंदांनी कार्यशाळेत उस्फूर्त सहभाग घेतला. संस्थेच्या विश्वस्तांनी कार्यक्रमाचा आढावा घेतला.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 8 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे