डॉ. कैलास सदगीर यांना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक मार्फत पीएचडी पदवी प्रदान…

डॉ. कैलास सदगीर यांना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक मार्फत पीएचडी पदवी प्रदान…
राहुरी तालुका जावेद शेख
श्री कैलास दत्तू सदगीर, अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर यांना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक द्वारे शिक्षणशास्त्र या विषयांमध्ये विद्यावाचस्पती पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. त्यांनी इमरटस प्रो.डॉ. कविता साळुंखे शिक्षण शास्त्र, संचालक स्कूल ऑफ ऑनलाईन लर्निंग आणि प्रोफेसर राम दाखवले व संशोधन विकसन केंद्र यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही पीएचडी पूर्ण केली आहे.
पीएचडी प्रदान केल्याबद्दल डॉ. कैलास सदगीर,अधिव्याख्याता यांचे डॉ. संजीवनी महाले संचालक शिक्षण शास्त्र विद्याशाखा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांनी अभिनंदन केले. कसा आहेस डॉ. राजेश बनकर, प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर जि. अहिल्यानगर , डाएट चे सर्व वरिष्ठ अधिव्याख्याता व अधिव्याख्याता , गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख अधिकारी, सर्व मुख्याध्यापक व शिक्षक व सर्व मित्र परिवार व आप्तेष्ट यांच्याकडून त्यांचे विशेष कौतुक व अभिनंदन करण्यात आले.