Breaking
ब्रेकिंग

संजय मामा शिंदे माध्यमिक विद्यालय कुर्डूवाडी येथे मोबाईल मध्ये वोटिंग मशीन ॲप घेऊन EVM मशीनद्वारे विद्यार्थ्यांना मतदान करण्याचे प्रशिक्षण

0 7 6 9 4 3

संजय मामा शिंदे माध्यमिक विद्यालय कुर्डूवाडी येथे मोबाईल मध्ये वोटिंग मशीन ॲप घेऊन EVM मशीनद्वारे विद्यार्थ्यांना मतदान करण्याचे प्रशिक्षण 

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. २२/ संजय मामा शिंदे माध्यमिक विद्यालय कुर्डूवाडी येथे मोबाईल मध्ये वोटिंग मशीन ॲप घेऊन EVM मशीनद्वारे मतदान करण्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेचा सर्व विद्यार्थ्यांना भरपूर आनंद घेतला.

मतदानाविषयी जागृती करणे हा उद्देश घेऊन एक आगळावेगळा उपक्रम घेण्यात आला. मतदानाच्या आधी मतदान प्रक्रिया, उमेदवार निवड, मतदान निकाल, याची सर्व माहिती श्रीकांत सावंत यांनी विद्यार्थ्यांना दिली. यामध्ये एकूण 5 उमेदवार उभे राहिले होते. 120 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मुख्यमंत्री म्हणून समर्थ आतकर, उपमुख्यमंत्री हर्षदा सावंत. तर इतर विद्यार्थ्यांना काही खाते वाटप करण्यात आले. या उपक्रमाद्वारे आम्ही मतदान केले तुम्हीही करा, हा संदेश विद्यार्थ्यांतर्फे देण्यात आला.

याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार टोणपे, सचिव रोहन टोणपे, कोषाध्यक्ष रोहित टोणपे, प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती रुक्मिणी वाघमोडे व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.

5/5 - (1 vote)

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे