Breaking
ब्रेकिंग

सनी शेरगिल यास शिविगाळ व मारहाण करणाऱ्यांवर ॲट्रॉसिटी दाखल करून कारवाई करा

मेहतर वाल्मिकी समाजाच्या वतीने पोलिस अधिक्षकांना निवेदन

0 7 6 9 4 3

सनी शेरगिल वर प्राणघातक हल्ला

 

सनी शेरगिल यास शिविगाळ व मारहाण करणाऱ्यांवर ॲट्रॉसिटी दाखल करून कारवाई करा

मेहतर वाल्मिकी समाजाच्या वतीने पोलिस अधिक्षकांना निवेदन

एस डब्ल्यू न्यूज नेटवर्क

राहुरी फॅक्टरी येथील सनी शेरगिल यास जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या व्यक्तींवर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करून कारवाई करण्याबाबत आज शनिवार दि . १५ मार्च रोजी नगर येथील मेहतर वाल्मिकी समाजाच्या वतीने अहिल्यानगरचे मा. पोलिस अधीक्षक राकेश ओला साहेब यांना निवेदन देण्यात आले .

निवेदनात म्हटले आहे की, आम्ही अहिल्यानगर येथील समस्त मेहतर वाल्मिकी समाजाच्या वतीने निवेदन देत असून सनी प्रकाश शेरगील रा. कामगार वस्ती राहुरी फॅक्टरी राहुरी जि. अहिल्यानगर, सनी शेरगील हा बुधवार दि. १२ मार्च रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास अंबिका नगर येथून घरी जात असताना रमेश मोरे , प्रकाश मोरे ,मारुती मोरे , कीरण मोरे, शीवराज मोरे सर्व रा. अंबिका नगर हे समोरून आले व सनी यास म्हणाले की ,तू भंग्याचा कीडा गु साफ करणारा जास्त माजला का जास्त शहाणा झाला का याला आज इथेच मारुण टाकू याचा कार्यक्रमच करू , असे म्हणत लोखंडी रॉड, गज व दांडक्यांनी सनी यांच्या डोक्यावर व अंगावर अमानुषपणे बेदम मारहाण केली व सनी याची दुचाकी गाडी स्पेलंडर ची तोडफोड केली व त्याचा मोबाईल, गळ्यातील सोन्याचे लॉकेट व खिशातील असलेले पैसे सुद्धा काढून घेतले आरडा ओरडाच आवाज ऐकून त्या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या काही नागरिकांनी त्या समाज कंटका पासून सनी याचा जीव वाचवला व त्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले . या सर्व आरोपींची त्या गावात दारू, मटके, जुगार असे धंदे चालत आहे गावात आज त्यांची खुप मोठ्या प्रमाणात दहशत आहे. तरी आम्ही अहील्यानगर येथील समस्त मेहतर वाल्मिकी समाजाच्या वतीने प्रशासनास विनंती करतो की दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या अश्या प्रकारच्या समाजकंटकावर कठोर कारवाई करून (अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अॅट्रॉसिटी कायदा अंतर्गत) गुन्हा दाखल करावा .

यावेळी मुन्ना ताई चावरे सरचिटणीस अखिल भारतीय सफाई मजदुर संघटना,सीमा प्रकाश शेरगील,अंकीता सनी शेरगील, सनीभैय्या खरारे जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय मेहतर समाज संघटना,राहुल लखन जिल्हा उपाध्यक्ष अखिल भारतीय मेहतर समाज संघटना,अर्जुन चोहान नंगर पंचायत कार्याध्यक्ष, पै.अनिल वाणे प्रदेश उपाध्यक्ष अखिल भारतीय सफाई मजदुर कांग्रेस, तालेवार भैय्या गोहेर राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय वाल्मिकी समाज संघटना, अजय सौदे युवा अध्यक्ष अखिल भारतीय सफाई कामगार संघटक, शुभम टाक उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अखिल भारतीय सफाई कामगार संघटक, आकाश ठाकुर राष्ट्रवादी शहर जिल्हा सरचिटणीस, सामाजिक कार्यकर्ते धिरज सारसर, गोविंद घोडके, विकास पंडित, दिपक नकवाल तसेच समाजाचे नागरिक महिला पुरुष मोठ्या संखेने उपस्थित होते .

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे