Breaking
ब्रेकिंग

नागपूर येथे १६ व १७ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलनाची आढावा बैठक संपन्न

0 7 6 9 4 3

नागपूर येथे १६ व १७ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलनाची आढावा बैठक संपन्न

प्रतिनिधी: सूर्यकांत होनप

करमाळा: दि. २२/ नागपूर येथे १६ व १७ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या श्री संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलनाची आढावा बैठक श्रीराम मंदिर वेताळ पेठ करमाळा येथे संपन्न झाली. या संमेलनास जास्तीत जास्त समाज बांधवांनी जाण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. नागपूर येथे या महासंमेलनास देशाचे पंतप्रधान, कॅबिनेट मंत्री, अनेक राज्याचे मुख्यमंत्री, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. श्री संत नामदेव शिंपी समाजातील सर्व पोट जाती तसेच सर्व शिंपी समाज बांधवांना सोबत घेऊन हे महासंमेलन होणार आहे. या महासंमेलनासाठी देशभरातून जवळपास पाच ते सहा लाख नामदेव शिंपी समाज बांधव असणार आहेत अशी माहिती विश्व महासंमेलन महिला अध्यक्ष सौ. मिनलताई कुडाळकर यांनी दिली आहे.

श्री संत नामदेव महाराज शिंपी समाजातील महिलांना या संमेलनासाठी येण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष शारदा जवंजाळ (मामी) यांनी मार्गदर्शन व आवाहन केले आहे. जनसंपर्क प्रमुख श्री अरविंद चांडोले यांनी या महा संमेलनासाठी जेष्ठ शिंपी समाज बांधवांना सुद्धा येण्याचे आवाहन व महासंमेलनाची माहिती अतिशय चांगल्या प्रकारे दिली मार्गदर्शन केले. तसेच पश्चिम महाराष्ट्र संघटक प्रमुख श्री संतोष मुळे यांनी समाजातील सर्व घटकातील बांधवांनी या संमेलना साठी येण्याचे आवाहन करून काही सूचना असतील तर सुचवा असे आवाहन करून जास्तीत जास्त समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले.

सोलापूर जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत चुंबळकर, शिंपी समाज अध्यक्ष व सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष रविंद्र वनारसे, जिल्हा सचिव पांडुरंग वडे, जिल्हा महिला संघटक सौ. संगीता वनारसे, जिल्हा महिला संघटक सौ. सोनाली पिसे यांनी नियोजन अतिशय चांगल्या प्रकारे केले होते. या आढावा बैठकीवेळी सोलापूर जिल्हा संघटक प्रमुख पदी श्री संतोष रमेश गानबोटे यांची निवड करून त्यांना प्रमाण पत्र देण्यात आले.

सूत्रसंचालन सोलापूर जिल्हा प्रसिद्ध प्रमुख अशोक गाठे यांनी केले. या आढावा बैठकीवेळी मार्गदर्शन करताना श्री संत नामदेव शिंपी समाजातील विश्वस्त श्री पांडुरंग गाठे, श्री रामचंद्र बोधे गुरुजी, ॲड. योगेश शिंपी, यांनी मार्गदर्शन केले. तसेच महिला जिल्हा उपाध्यक्ष सौ. वैशाली वडे, यांनी ही मनोगत व्यक्त केले. या आढावा बैठकीसाठी समाजातील ज्येष्ठ विजयकुमार माळवदकर गुरुजी, संतोष (पिन्टु) गानबोटे, मुकुंद वनारसे, दिपक गुजर, सतीश वनारसे, राजेंद्र चुंबळकर, गजानन चौकटे, देवीदत्त गाठे, दिलीप वनारसे, प्रशांत गाठे, विजय चुंबळकर, राजेंद्र धोकटे तसेच शिंपी समाजातील समाज बांधव व महिला या आढावा बैठकीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

5/5 - (1 vote)

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे