आडसूळ पॉलिटेक्निकच्या १४० विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कॅम्पस मुलाखतीतून निवड
आडसूळ पॉलिटेक्निकच्या १४० विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कॅम्पस मुलाखतीतून निवड
प्रतिनिधी आसावरी वायकर
चास, अहिल्यानगर : येथील सौ. सुंदरबाई माणिक आडसूळ तंत्रनिकेतनच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे. नुकत्याच पार पडलेल्या परिसर मुलाखतीमध्ये आडसूळ तंत्रनिकेतनच्या १४० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. मुलाखत घेण्यासाठी इटॉन इंडस्ट्रियल सिस्टीम प्रा. ली., रेम्बो इंटिग्रेटेड मल्टिटेक प्रा. लि., प्रोमाईड ए. आय. प्रा. लि., प्रोअँझुअर सॉफ्टवेअर सोलुशनस प्रा. लि., कोनक डीजीफेक्स नेक्स्टजेन प्रा. लि. इत्यादी नामांकित कंपन्यांनी अडसूळ पॉलीटेक्निक मध्ये हजेरी लावली.
त्यापैकी इटॉन इंडस्ट्रियल सिस्टीम प्रा. ली. ह्या कंपनीने ३८ विद्यार्थ्यांची मुलाखती द्वारे निवड केली.
रेम्बो इंटिग्रेटेड मल्टिटेक प्रा. लि., ने ५६ विद्यार्थी नोकरीस पात्र ठरवले. प्रोमाईड ए. आय. प्रा. लि. व कोनक डीजीफेक्स नेक्स्ट जेन प्रा. लि. या दोन्ही कंपन्यांनी प्रत्येकी २० विद्यार्थ्यांची निवड केली.
प्रोअँझुअर सॉफ्टवेअर सोलुशनस प्रा. लि. ने ६ विद्यार्थी नोकरीस पात्र ठरवले.
निवड प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडलेल्या विद्यार्थ्यांना विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांनी दोन लाख चाळीस हजारा पर्यंतचे आरंभीचे पॅकेज जाहीर केले आहे. दर्जेदार शिक्षण पद्धती, संवाद कौशल्य, भरपूर प्रात्यक्षिकाचा सराव व त्यातील विद्यार्थ्यांनी आत्मसात केलेले सूक्ष्म कौशल्य, औद्योगिक प्रशिक्षण, क्षेत्रभेटी व वेळोवेळी तंत्रनिकेतनने आयोजित केलेले तज्ञ व्याख्यात्यांचे आयोजित केलेले व्याख्याने यांचा प्रचंड फायदा विद्यार्थ्यांच्या निवड प्रक्रियेमध्ये झाल्याची भावना आपल्या मनोगतात निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. आडसूळ तंत्रनिकेतन मधील स्थापत्य अभियांत्रिकी, यंत्र अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी व ई .अँड. टी . सी. अभियांत्रिकी विभागातील तृतीय वर्षात शिकत असलेले एकून २१४ विद्यार्थी परिसर मुलाखतीस सामोरे गेले त्या पैकी आडसूळ तंत्रनिकेतन
मधून एकूण १४० विद्यार्थ्यांची परिसर मुलाखतीतून यशस्वीरित्या निवड करण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांस वार्षिक पॅकेज 2.4 लाख मिळाले.
प्रोअँझुअर सॉफ्टवेअर सोलुशनस प्रा. लि.चे सी.ई.ओ. बापू अर्कस यांनी विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रात लागणाऱ्या विविध कौशल्यबाबत माहिती देऊन औद्योगिक क्षेत्रात काम करत असताना उत्तरोत्तर अभियंता म्हणून विकसित होण्यासाठी मौलिक मार्गदर्शन केले.
प्रसंगी ग्रामीण विकास सेवा संस्थेच्या सचिव सौ. लिनाताई आडसूळ, डायरेक्टर कृष्णा आडसूळ, तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रा. रमेश गडाख विविध कंपन्यांचे एच. आर. मॅनेजर उपस्थित होते. संस्थेच्या सचिव सौ लिनाताई आडसूळ यांनी कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की आडसूळ पॉलिटेक्निक मध्ये दरवर्षी विविध नामांकित कंपन्यांचे कॅम्पस मुलाखतींचे आयोजन केले जाते दरवर्षी शेकडो विद्यार्थ्यांची निवड ही बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये होत असते, याचे कारण विद्यार्थ्यांमध्ये तंत्रशिक्षणातल्या मूलभूत संकल्पना विविध उपक्रमाद्वारे विकसित करून, औद्योगिक क्षेत्रात लागणारे सर्व कौशल्य व मुलाखतीतीस समोर जाण्यासाठीचे धारिष्ट विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केले जाते. याचे सर्व श्रेय पॉलिटेक्निकचे प्राचार्य गडाख आर. एस. सर्व विभाग प्रमुख व शिक्षकांचे असून पॉलिटेक्निकचे शिक्षण हे तंत्रशिक्षणातील कौशल्य वृद्धिंगत करून विद्यार्थ्यांना अल्पावधीत रोजगारक्षम बनवत असल्यामुळेच दरवर्षी विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा कल हा पॉलीटेक्निककडे वाढत आहे असे सांगून विद्यार्थ्यांना निवड प्रक्रियेसाठी शुभेच्छा दिल्या. तंत्रनिकेतनचे प्राचार्य गडाख आर. एस. यांनी आमचे विद्यार्थी केवळ परीक्षार्थी नसून तांत्रिक व औद्योगिक क्षेत्रातच लागणाऱ्या कौशल्याने परिपूर्ण असल्यामुळेच होणाऱ्या प्रत्येक परिसर मुलाखतीत बहूसंख्येने निवडीस पात्र ठरत आलेले आहेत. विद्यार्थ्यांनी फक्त वेतनापुरतं काम न करता औद्योगिक क्षेत्रातले विविध बारकावे, घडामोडी, उत्पादन प्रक्रिया व उत्पादन प्रक्रियेतील समस्या याचा बारकाईने अभ्यास करावा कुशल अभियंता म्हणून नावलौकिक मिळवावा असे प्रतिपादन केले.
निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा. श्री अनिरुद्ध माणिक आडसूळ, सेक्रेटरी सौ. लीनाताई आडसूळ, खजिनदार मा. श्री परमेश्वर आडसूळ, संचालक श्री.कृष्णा आडसूळ, सदस्य कल्पना आडसूळ, रत्ना आडसूळ, पायल आडसूळ, प्राचार्य व डायरेक्टर डॉ. प्रदीप एम. पाटील, आडसुळ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. संभाजी पठारे, तंत्रनिकेतनचे प्राचार्य मा. गडाख आर. एस., ट्रेनिंग व प्लेसमेंट आधिकारी प्रा.पवळे एस. एस. विभाग प्रमुख प्रा.पाळंदे एस . सी., प्रा. होले पी .पी. प्रा.म्हस्के प्रा.जाधव एम.बी. , यांनी कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


