ढेकू रोड मुख्य रस्त्याचे काम अर्धवट स्वरूपात असल्याने नागिराकांचे हाल*
वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात होतोय त्रास

*ढेकू रोड मुख्य रस्त्याचे काम अर्धवट स्वरूपात असल्याने नागिराकांचे हाल*
वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात होतोय त्रास
वि. उपसंपादक :- पंकज पाटील
अमळनेर :- मागील काही महिन्यापासून ढेकू रोड (प्र. जि. मा.-५१) या मुख्य रस्त्याचे काम अर्धवट स्वरूपात सोडून दिल्यामुळे ढेकू रोड व पिंपळे रोड वरील रहिवास्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून या रस्त्यावरून वापरणाऱ्या ज्येष्ठांपासुन सर्व वर्गातील नागरिकांना पाठीचे व मनक्यांच्या त्रासाचे प्रमाण वाढले असुन, वाहनांच्या खराव होण्याच्या प्रमाणात देखील वाढ झाल्याने सामान्य नागरिकांना वाहनांच्या देखभाल दुरुस्तीचा नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तसेच रस्त्याची अवस्था खराव असल्याने अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे या सर्व गोष्टींमुळे ढेकू रोड वासीयांच्या जीवितास धोका वाढला आहे. तरी आपण ढेकू रोड या मुख्य रस्त्याच्या कॉक्रीटीकरणाचे काम तात्काळ पुर्ण करावे. अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ या रस्त्याचे काम मार्गी लावावे या मागणीचे निवेदन आज कार्यकारी अभियंता सो.राऊत यांना श्याम जयवंतराव पाटील यांनी सहकाऱ्यांच्या उपस्थितीत दिले.