राष्ट्रीय शिक्षण मंडळाचे एन. एन. सथ्था कॉलेज ऑफ फार्मसी आणि इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी सुमतेरा (ITERA), इंडोनेशिया यांच्यातील आंतरराष्ट्रीय सामंजस्य करार. . .
राष्ट्रीय शिक्षण मंडळाचे एन. एन. सथ्था कॉलेज ऑफ फार्मसी आणि इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी सुमतेरा (ITERA), इंडोनेशिया यांच्यातील आंतरराष्ट्रीय सामंजस्य करार. (MOU)
इंडोनेशिया देशाशी करार करणारे शहरातील पहिलेच कॉलेज
एस डब्ल्यू न्यूज / वृत्तसेवा
शहरातील आनंदधाम व बँक ऑफ इंडिया समोरील एन. एन. सथ्था कॉलेज ऑफ फार्मसी अहिल्यानगर आणि इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी सुमतेरा (ITERA), या इंडोनेशिया मधील प्रतिष्ठित विश्वविद्यालय यांच्यात एक महत्वाच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आल्याची माहिती कॉलेजचे प्राचार्य डॉ. विशाल पांडे यांनी आज दिली . या सामंजस्य कराराद्वारे दोन्ही संस्थांमध्ये शैक्षणिक, वैज्ञानिक आणि संशोधन क्षेत्रात सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने अनेक उपक्रम राबवले जाणार आहेत.
सामंजस्य कराराच्या अंतर्गत विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची शैक्षणिक व संशोधन देवाणघेवाणसाठी संधी उपलब्ध होईल तसेच दोन्ही संस्थानांना त्यांच्या संशोधन प्रकल्पांना सहकार्य करण्याचा आणि नवे संशोधन क्षेत्र शोधण्याचा एक मंच प्राप्त होईल असे यावेळी नमूद करण्यात आले.
या सामंजस्य करारामुळे भारतीय विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर शिक्षणाच्या आणि संशोधनाचा क्षेत्रातील नवीन दृष्टिकोनाचा लाभ होणार आहे. सदर समंजस्य करारानुसार दोन्ही संस्थांना खालील लाभ होणार आहे,
-संयुक्त संशोधन सहकार्य
-संयुक्त कार्यक्रम परिषद कार्यशाळा आणि परिसंवाद.
-व्यावहारिक प्रशिक्षण आणि एकात्मिक ज्ञानाचा कार्यक्रम
-अध्यापन कर्मचाऱ्यांची देवाणघेवाण
-पदवीपूर्व विद्यार्थ्यांची देवाणघेवाण.
-संशोधन निधी उभारण्यासाठी सहकार्य.
या सामंजस्य करारामुळे विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक यांना संशोधन क्षेत्रात अभूतपूर्व कार्य करण्याची मौलिक संधी प्राप्त झालेली आहे. या सामंजस्य करारासाठी संस्थेची सचिव अॅड विद्याधर काकडे,विश्वस्त हर्षदाताई काकडे, पृथ्वीसिंह काकडे, भाग्यश्री काकडे -पाटील व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण बिटाळ यांनी मोलाचे मार्गदर्शन केले .प्राचार्य डॉ.विशाल पांडे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या अथक प्रयत्नांचे हे फलित आहे.