Breaking
ब्रेकिंग

अमळनेर शहरात पाणी पुरवठा व्यवस्थेची स्थिती अत्यंत दयनीय 

0 3 9 0 8 1

अमळनेर शहरात पाणी पुरवठा व्यवस्थेची स्थिती अत्यंत दयनीय 

प्रतिनिधी :- पंकज पाटील

अमळनेर :- अमळनेर दिनांक 11 मार्च शहरातील रामेश्वर नगर मधील नागरिकांनी अमळनेर नगर परिषदेवरआपल्या विविध मागन्यानंसाठी मोर्चा काढला त्यावेळी मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी निवेदन स्वीकारले. त्यावेळी भाजपा शहर चिटणीस समाधान पाटील यांनी आपल्याला निवेदनात विविध समस्यांमध्ये कचरा गाडी म्हणजे घन्टा गाडी न येणे, कर्मचारी वेळेवर कचरा घोळा न करणे,पाणीपुरवठा करणाऱ्यांची बदली करणे वा पाणी पुरवठा सुरळीत करणे. अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले .

त्यावेळी भाजपा जेष्ठ सभासद दिलीप ठाकूर कॉलनीतील रहिवाशी चेतन चौधरी, उषा पाटील, कोकिळाबाई मराठे, नाना सोनवणे, जगदीश सोनार, जयेश महाजन, कुसुमताई पाटील, आबाबाई परदेशी, भारती पाटील, रत्‍नाबाई चौधरी, सविताबाई सोनार, शोभाबाई सैंदाणे उपस्थित होते.

प्रति,मुख्य कार्यकारी अधिकारी,अमळनेर नगरपरिषद,अमळनेर, जिल्हा जळगाव.विषय: कार्य दरिद्र पाणी पुरवठा अधिकाऱ्याची (विजय विसावे )तात्काळ बदली करण्याबाबत अर्ज.मान्यवर,मी, समाधान नाना पाटील (भाजपा युवा मोर्चा शहर सरचिटणीस) राहणार रामेश्वर नगर, अमळनेर या ठिकाणी निवासी आहे. मी आपल्याला कळवू इच्छितो की, अमळनेर शहरात पाणी पुरवठा व्यवस्थेची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. पाणी पुरवठा विभागाचे कार्यकुशलतेतील कमतरता आणि समस्यांमुळे नागरिकांना पाणीपुरवठा आणि संबंधित सेवांमध्ये खूप अडचणी येत आहेत.पाणी पुरवठा अधिकारी call उचलत नाही अरे रावी ची भाषा करतात, नाही सोडायचं मला पाणी, तुमच्या कडून जे होईल ते करून घ्या, मी CO साहेबांशी बोलून घेईल, मी कोणाला घाबरत नाही असे उत्तर अधिकारी देतात.आणि पाणी पुरवठा अधिकाऱ्याने आपले कर्तव्य पार न केल्यामुळे नागरिकांचे अनेक तास वाया जात आहेत. शहरातील पाणी समस्या अधिक गंभीर बनत चालल्या आहेत आणि त्यावर योग्य तो उपाय नाहीत. यामुळे जनतेमध्ये चांगली नाराजी आहे. पाणी पुरवठा अधिकाऱ्याच्या कार्यप्रदर्शनामुळे नागरिकांची राहणीमान आणि सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहेत.त्यामुळे, मी आपल्याकडे विनंती करतो की, पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्याची तात्काळ बदली करण्यात यावी. तसेच, यासंबंधी योग्य त्या कारवाईची मागणी करतो.आपल्या कडून याबाबत त्वरित कार्यवाही होईल, अशी आशा व्यक्त करतो.

1/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 8 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे