Breaking
ब्रेकिंग

यापुढे कोणतेही पार्श्वगायन करणार नाही

अरिजीत सिंहचा निवृत्तीचा निर्णय… ?

0 7 6 9 4 1

यापुढे कोणतेही पार्श्वगायन करणार नाही

अरिजीत सिंहचा निवृत्तीचा निर्णय… ?

एस डब्ल्यू न्यूज रिपोर्ट

चाहत्यांच्या गळय़ातील ताईत बॉलीवूडचा लोकप्रिय गायक अरिजीत सिंगने अचानक निवृत्ती जाहीर करत सर्वांनाच धक्का दिला आहे. त्याने ‘एक्स’ पोस्ट केली असून यापुढे पार्श्वगायक म्हणून मी कोणतेही नवीन काम घेणार नाही, असे स्पष्ट केले आहे. ‘माझा प्रवास खूपच सुंदर होता. मी आनंदी आहे. आज मी निवृत्ती घेतोय. या प्रवासात तुम्ही मला जे प्रेम दिले त्यासाठी मी तुमचा ऋणी आहे,’ अशा भावना अरिजीतने व्यक्त केल्या आहेत.

नमस्कार, तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. गेल्या काही वर्षांत मला इतके प्रेम देणाऱ्या माझ्या सर्व श्रोत्यांचे मी आभार मानू इच्छितो. मी हे स्पष्ट करू इच्छितो की यापुढे मी पार्श्वगायक म्हणून कोणतेही नवीन काम स्वीकारणार नाही. मी ते येथे संपवत आहे. हा एक अद्भुत प्रवास होता.”

मंगळवारी रात्री 8.30 वाजता अरिजितने इंस्टाग्राम आणि फेसबुकवर ही पोस्ट लिहित जाहीर केलं. अरिजितच्या या पोस्टखाली त्याच्या चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला. अरिजितने पार्श्वगायन सोडू नये असं अनेकांनी त्याला आवाहन केलं. तर काही जणांनी त्याच्या संगीत कारकिर्दीबद्दल आणि त्याच्या योगदानाबद्दल आभार मानले. अरिजीत सिंहने 2005 मध्ये फेम गुरुकुल या रिअॅलिटी शोमधून आपल्या संगीत कारकिर्दीला सुरुवात केली. 2011 मध्ये, ‘मर्डर 2’ चित्रपटातील ‘फिर मोहब्बत’ या गाण्याच्या माध्यमातून अरिजीतने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे