पोलीस व ग्रामसेवक पदावर निवड झालेल्या दोघा तरुणांचा शिरुड वि.का.सोच्या वतीने सत्कार
पोलीस व ग्रामसेवक पदावर निवड झालेल्या दोघा तरुणांचा शिरुड वि.का.सोच्या वतीने सत्कार
प्रतिनिधी :- पंकज पाटील
अमळनेर : तालुक्यातील शिरुड येथील योगेश विरभान पाटील ग्रामसेवक तर गौरव सुनील पाटील याची मुंबई पोलीस दलात निवड झाल्याबद्दल गावकऱ्यांनी त्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.गावातील युवकांनी मेहनत करून अभ्यास करून स्वबळावर यश मिळवावे म्हणून तरुणांना प्रेरणा देण्यासाठी गावकऱ्यांनी हा सत्कार केला.तसेच तरुण मुलांना स्पर्धा परिक्षा अभ्यासासाठी रूम मध्ये बैठक, सुविधा व्यवस्था बाबत बापुराव महाजन यांनी पुढाकार घेताला येणाऱ्या काळात अभ्यास करुन तरुणांना नोकरीची संधी मिळावी जास्तीत जास्त तरूण शासकिय सेवेत कार्यरत होतील यासाठी नेहमीचं मार्गदर्शन राहील.
यावेळी वि.का.सो चेअरमन बापुराव महाजन सद्स्य अरुण पाटील, वासुदेव पाटील, सीताराम पाटील, गावातील डॉ जयवंत पाटील, प्रकाश पाटील, विश्र्वास पाटील, भुरा पाटील नंदू पाटील, नारायण पाटील, संदिप पाटील, सुनिल पाटील, सागर मोरे, नीलकंठ पाटिल, रामदास पाटील, अंकित पाटील, सागर पाटील, अमोल पाटील, विनायक पाटील, वसंत पाटील ग्रा.प सदस्य कल्पेश माळी, सेल्समन विरभान पाटील, बापू मोरे, वैभव पाटील गावातील व तरुण व ग्रामस्थ उपस्थित होते.