पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जन्मशताब्दी उत्सव साजरा

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जन्मशताब्दी उत्सव साजरा
वि. उपसंपादक :- पंकज पाटील
अमळनेर :-अमळनेर येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मशताब्दी उत्सव साजरा करण्यात आला. महिला मोर्चा शहराध्यक्षा माधुरी प्रमोद पाटील यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. उपाध्यक्ष प्रा. शीला पाटील, उपाध्यक्ष ज्योती भामरे, सचिव करुणा सोनार यांनी सहकार्य केले. प्रा हेमलता भोसले यांनी सूत्रसंचालन केले. तसेच प्रास्ताविक प्रा. शीला पाटील यांनी केले . वसुंधरा लांडगे यांनी माॅ साहेब अहिल्याबाई होळकर यांची माहिती सांगितली. अध्यक्षीय भाषण माधुरी पाटील यांनी केले तसेच प्रा. उषा पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी मराठा महिला मंडळ, सावित्रीबाई फुले जेष्ठ महिला मंडळ, योगा ग्रृप, सुवर्णकार महिला भजनी मंडळ यांनी उपस्थिती दिली. पद्मजा पाटील ,अलका पाटील, नीता चौधरी ,शोभा शिंदे, छाया पाटील, सुरेखा विसपुते ,योगशिक्षिका कामिनी पवार, सविता पाटील,शोभा पांडव, यांचे सहकार्य लाभले.