Breaking
ब्रेकिंग

शिक्षक भारती अहिल्यानगर संघटकपदी चंद्रशेखर हासे यांची निवड

0 3 9 0 3 5

शिक्षक भारती अहिल्यानगर संघटकपदी चंद्रशेखर हासे यांची निवड

राहुरी प्रतिनिधी :   जावेद शेख

साने गुरुजी स्मारक पुणे येथे शिक्षक भारती राज्य कार्यकारणी बैठकीत सह्याद्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ब्राह्मणवाडा ता. अकोले येथील इंग्रजी विषयाचे प्राध्यापक चंद्रशेखर हासे यांची अहिल्यानगर जिल्हा संघटक पदी निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष सुभाष मोरे, प्रमुख कार्यवाह संजय वेतुरेकर यांच्या सहीचे नियुक्तीपत्र हासे यांना देण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या .शिक्षक भारती संघटना ही धर्मनिरपेक्ष, लोकशाही, समतावादी आणि विज्ञाननिष्ठ समाज निर्मितीसाठी कार्य करणारी संघटना आहे .

यावेळी ज्युनिअर कॉलेज युनिट महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष जी.टी. पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र झाडे, धनाजी पाटील, पुणे विभागीय कार्याध्यक्ष महेश पाडेकर,सुनील गाडगे विनाअनुदान विरोधी कृती समितीचे महिला अध्यक्ष रूपालीताई कुरुमकर, जिल्हाध्यक्ष रामराव काळे , आप्पासाहेब जगताप, दादासाहेब जगताप, राजीव शिरसठ, विविध जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष पदाधिकारी यांनी संघटनेच्या वतीने यावेळी हासे यांचे अभिनंदन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 3 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे