Breaking
ब्रेकिंग

संजय वायकर राज्यस्तरीय उत्कृष्ठ पत्रकार पुरस्काराने सन्मानित

गरुड फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

0 3 9 0 8 2

संजय वायकर राज्यस्तरीय उत्कृष्ठ पत्रकार पुरस्काराने सन्मानित

गरुड फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

अहिल्यानगर / प्रतिनिधी : संवेद

ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य अहिल्यानगरचे जिल्हा सचिव आणि नमो बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री . संजय चंद्रकांत वायकर यांना
पत्रकारिता क्षेत्रातील उत्कृष्ठ कार्याबद्दल नामांकित गरुड फाउंडेशन महाराष्ट्र व युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र यांच्या वतीने नुकताच आदर्श पत्रकारिता पुरस्कार दि . ७ जुन २०२५ रोजी दिमाखदार सोहळ्यात मोठ्या सन्मानाने देण्यात आला .

महाराष्ट्रातील वैद्यकीय, प्रशासकीय,सहकार, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, उद्योग, कृषी, पत्रकारिता,आरोग्य, पर्यावरण, क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय व समाज हिताचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्रातील नामांकित पुरस्कारांपैकी समजला जाणारा पुरस्कार दिला जातो. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे अण्णासाहेब शिंदे सभागृह येथे अहिल्यानगरचे खासदार निलेशजी लंके, माजी मंत्री प्राजक्तदादा तनपुरे, रावसाहेब खेवरे, पोलीस आयुक्त संदीप भांड, तहसीलदार नामदेव पाटील, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, रमेश खेमनर, पत्रकार जावेद शेख यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले .

संजय वायकर यांचे शहरी व ग्रामीण भागात सामाजिक व पर्यावरण क्षेत्रात भरीव योगदान आहे . नागरिकांना येणाऱ्या विविध अडचणीं विषयी पत्रकारितेच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी यांनी तळमळीने काम केले यामुळे त्यांना राज्यस्तरीय उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार प्रदान झाल्याबद्दल खा . निलेशजी लंके व मा . राज्यमंत्री प्राजक्त दादा तनपुरे यांनी अभिनंदन केले . तसेच विविध राजकीय सामाजिक स्तरातून संजय वायकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 8 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे