निर्मलनगर येथे श्री गणेश प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन
निर्मलनगर प्रतिष्ठानचे भक्तिमय सोहळ्याचे आयोजन

निर्मलनगर येथे श्री गणेश प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन
एस डब्ल्यु न्यूज़ नेटवर्क
अहिल्यानगर : सावेडी भागातील पावन गणपती मंदिर, गाडेकर चौक निर्मलनगर, अहिल्यानगर येथे निर्मलनगर प्रतिष्ठान च्या वतीने मा. श्री. संग्राम भैय्या जगताप आमदार (विधानसभा सदस्य) आणि मा. श्री. अक्षय दादा कर्डिले आमदार (विधानसभा सदस्य) यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीगणेश प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार असून महंत बालयोगी गुरुवर्य शिवदत्त बाबावृंदावन आश्रम, शहापूर, अहिल्यानगर यांच्या पावन हस्ते श्री कलशाची विधिवत स्थापना करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा :
१२ सप्टेंबर २०२६ रोजी सायं. ४:०० ते ८:३० वा.
श्री गणेश मूर्ती मिरवणूक (रामराज्य वाद्यपथक) मार्ग : भगवान बाबा चौक, मुळे STD चौक, गाडेकर चौक असा असणार आहे .१३ सप्टेंबर २०२६ रोजी स. ८:०० ते सायं. ४:०० वा.श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात होणार आहे . सायं. ५:०० ते रात्री ८:०० वा.श्री दक्षिणमुखी हनुमान सत्संग मंडळ (ट्रस्ट) द्वारा प्रस्तुत सामूहिक श्री हनुमान चालीसा पाठ व भजन संध्या होणार आहे . रात्री ८:०० वा. भाविक भक्तांसाठी महाप्रसाद असणार आहे .
४ ते ५ या वेळेत महिलांना फेटे बांधण्यात येतील.
श्री गणरायाच्या मंगलमय सोहळ्याची शोभा वाढवण्यासाठी सहकुटुंब व मित्र परिवारासह उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक निर्मलनगर प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे .



