Breaking
ब्रेकिंग

डॉ.तनपुरे कारखान्याच्या निवडणूकीत शेतकऱ्यांच्या हितासाठी योग्य पर्याय देणार-सुरेशराव लांबे पाटील

0 3 9 0 6 1

डॉ.तनपुरे कारखान्याच्या निवडणूकीत शेतकऱ्यांच्या हितासाठी योग्य पर्याय देणार-सुरेशराव लांबे पाटील

राहुरी तालुका प्रतिनिधी : जावेद शेख

श्री छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या आदेशानंतर डॉ.तनपुरे कारखाना निवडणूक लढविण्यास राहुरी तालुक्यातील अनेक अवैद्य धंदे करणारे भ्रष्ट छोटे-मोठे पुढारी निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहेत.अशा व्यवस्थापनामुळेच तर हा कारखाना अडचणीत आला आहे त्यामुळे येणाऱ्या कारखाना निवडणुकीत शेतकरी कामगार व्यापारी यांच्या हितासाठी समविचारी कार्यकर्ते यांना सोबत घेऊन निवडणुकीत मतदारांना योग्य पर्याय देणार असल्याची ग्वाही प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष शेतकरी नेते सुरेशराव लांबे पाटील यांनी दिली.

माध्यमांशी पुढे बोलताना लांबे पाटील म्हणाले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भौगोलिक दृष्ट्या संपन्न असलेल्या राहुरी तालुक्यातील दि राहुरी सहकारी साखर कारखानाचे नामांतर करून श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देऊन त्याचे पुन्हा नामांतर करुन डॉ बा बा तनपुरे कारखाना असे नाव देण्यात आले.तालुक्यातील व तालुक्या बाहेरी पुढाऱ्यांनी राजकारण करून आलटून पालटून सत्ता उपभोगली सत्तेचा गैरवापर करून तालुक्यातील शेतकरी कामगार व्यापारी यांचे कुठलेही सार्वजनिक हित न पहाता सर्वच व्यवस्थापनाने स्व हितासाठी काम करून शेतकरी व कामगारांचे फार मोठे नुकसान केले,त्या डॉ.तनपुरे सहकारी साखर कारखान्याची तीन वर्षांपासून रखडलेली निवडणूक प्रक्रिया में २०२५ पर्यंत घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले.असून १७ मे.रोजी मतदान व १८ मे रोजी मतमोजणी होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे.तरी या निवडणुकीत शेतकरी कामगार व्यापारी यांच्या हितासाठी समविचारी कार्यकर्ते यांना सोबत घेऊन योग्य उमेदवार निवडणूकीत उभे करून योग्य पर्याय देणार असल्याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष शेतकरी नेते सुरेशराव लांबे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 6 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे