आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेचे नाशकात अधिवेशन उत्साहात
आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेचे नाशकात अधिवेशन उत्साहात
प्रतिनिधी :- पंकज पाटील
धुळे :- नाशिक शहरातील सीटू भवन येथे महाराष्ट्र राज्य आरोग्यमित्र कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष कॉ.डॉ.डी.एल. कराड यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य मित्रांचे राज्यस्तरीय अधिवेशन पार पडले.
आपल्या मागण्या सरकार पर्यंत पोहचवणे खुप गरजेचे आहे. आरोग्यमित्रांना किमान वेतन कायद्यानुसार मिळाले पाहिजे. विविध मागण्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
यांना निवेदन देवू. मागण्या मान्य न केल्यास राज्यभर काम बंद आंदोलन करू. असा इशारा कॉ.डॉ.डी.एल. कराड यांनी राज्यस्तरीय अधिवेशन प्रसंगी दिला. या अधिवेशनात राज्यातील सर्व जिल्ह्यातील आरोग्यमित्रांनी सहभाग घेतला. यावेळी डॉ. कराड यांनी राज्यातील विविध जिल्ह्यातील आरोग्यमित्रांची पदाधिकारी म्हणून नेमणुक करून संघटनेची कमिटी स्थापन केली. तसेच आरोग्यमित्रांच्या विविध समस्याही जाणून घेतल्या.