
शहरातुन मोटर सायकल अज्ञात चोरट्यांनी नेली चोरून
मोटर सायकल चोरीची आणखी एक घटना
वि. उपसंपादक :- पंकज पाटील
अमळनेर :- अमळनेर
शहरातुन दिनांक 19.05.2025 रोजी रात्री 09.00 वाजेचे सुमारास देविदास पाटील हे ठगुबाई रिसॉर्ट येथे गेले असता. त्यावेळी त्यांच्या मालकीची मोटर सायकल हि ठगुबाई रिसॉर्ट समोर लावलील होती. त्यानंतर तेथील काम झाल्यानंतर ते रात्री 10.00 वाजेचे सुमारास त्यांना ठिकाणी मोटर सायकल हि तेथे दिसली नाही.
म्हणुन ठगुबाई रिसॉर्टच्या आजुबाजुस मोटर सायकलचा शोध घेतला असता.ती त्यांना मिळुन आली नाही म्हणुन देविदास पाटील व त्यांचा मुलगा कल्पेश नाना पाटील, मित्र रविंद्र शिवदास पाटील आणि राजेंद्र महादु पाटील अशांना फोन करून ठगुबाई रिसॉर्ट गलवाडे रोड येथे बोलवुन त्यांना माहिती दिली.व त्यानंतर सर्वांनी मिळुन मोटर सायकलचा ठगुबाई रिसॉर्ट परीसरात तसेच अमळनेर शहरात आज पावेतो शोध घेतला परंतु ती आम्हास मिळून आली नाही. त्यावेळी त्यांची पक्की खात्री झाली की कोणीतरी अज्ञात चोरट्याने माझी मोटर सायकल हि चोरून नेली आहे तरी तिचे वर्णन खालील प्रमाणे. 1) 20,000/- रू किं ची एक काळ्या रंगाची हिरो कंपनीची स्पेल्डर मोटर सायकल क्र जी जे 05 एफ व्ही 0051 तिचा चेचीस नं . MBLHAW096L5A02377 व इंजीन HA10AGL5A04553 तरी अज्ञात चोरट्याविरूद्ध फिर्याद दिली आहे.
सदर घटनेची पो .हे .काँ . चंद्रकांत पाटील हे तपास करीत आहोत.