न्यू इंग्लिश स्कूलचे माजी विद्यार्थी ३० वर्षानंतर आले एकत्र
हृदयस्पर्शी स्नेहमेळाव्यात जुन्या आठवणींना उजाळाः गुरुजनांचा सन्मान आनंद, हसरा संवाद आणि मैत्रीचा उत्कट सोहळ्याने भारावले माजी विद्यार्थी.

न्यू इंग्लिश स्कूलचे माजी विद्यार्थी ३० वर्षानंतर आले एकत्र
हृदयस्पर्शी स्नेहमेळाव्यात जुन्या आठवणींना उजाळाः गुरुजनांचा सन्मान आनंद, हसरा संवाद आणि मैत्रीचा उत्कट सोहळ्याने भारावले माजी विद्यार्थी.
नारायणडोह/प्रतिनिधी
नगर : नगर तालुक्यातील चिंचोडी पा स्कूलच्या १९९५ सालच्या दहावी च्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. तब्बल ३० दशकांनंतर विद्यालयाच्या आवारात पुन्हा एकदा त्या निरागस आठवणी जाग्या झाल्या. बालपणाच्या गोड वळणांवर नजर फिरवत, जुन्या शालेय जीवनातील आठवणीशी माजी विद्यार्थी पुन्हा एकरूप झाले होते, अशी माहिती जिवाजी लगड यांनी दिली
स्नेहमेळाव्याचा शुभारंभ विद्यालय भेटीने झाला. त्यानंतर सर्व माजी विद्यार्थी हॉटेल यश ग्रँड रंगतदार गेट टु गेदरसाठी एकत्र आले.
या कार्यक्रमात हास्यविनोद, कविता गायन,
गाणी, खेळ, जुन्या फोटोंची झलक. स्मरणिका सादरीकरण यांसारख्या ष्टींमुळे वातावरण हलकंफुलकं आणि उत्साही राहिलं. काही विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनप्रवासातील अनुभव शेअर करत पुढच्या पिढीसाठी प्रेरणादायी विचार सांगितले. शेवटी सर्वांनी मिळून वृक्षसंवर्धन, शाळेसाठी निधी उभारणी, गावाचा विकास आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदतीचा संकल्प केला. केवळ स्नेहमेळावा न राहता हा एक सामाजिक बांधिलकीचा ठसा उमटवणारा कार्यक्रम ठरणार असल्याची भावना माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
हे सर्व नियोजन करण्या साठी किरण मोरे,विकास हजारे,जाणदेव पवणे,रवी कोकाटे ,संदीप खामकर, जिवाजी लगड ,सौ प्रमिला झांबरे इ. परिश्रम घेतले