Breaking
ब्रेकिंग

करमाळा येथे तालुकास्तरीय दांडपट्टा स्पर्धा संपन्न

तब्बल 250 खेळाडूंनी नोंदवला सहभाग

0 3 9 0 8 0

करमाळा येथे तालुकास्तरीय दांडपट्टा स्पर्धा संपन्न

तब्बल 250 खेळाडूंनी नोंदवला सहभाग

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. २४/ करमाळा येथे तालुकास्तरीय दांडपट्टा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धा करमाळा येथील कर्मवीर आण्णसाहेब जगताप विद्यालय मध्ये संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये करमाळा तालुक्यामधून विविध शाळेमधील 250 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेमध्ये वामनराव बदे माध्यमिक विद्यालय उमरड या संघाने प्रथम पारितोषिक जिंकले तर श्री छत्रपती शिवाजी विद्यालय वीट या संघाने द्वितीय पारितोषिक जिंकण्याचा मान मिळवला. त्याचबरोबर तृतीय पारितोषिक महात्मा गांधी विद्यालय व कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालय करमाळा संघाने मिळवला. चौथ्या स्थानी करंजे जिल्हा परिषद शाळा राहिली व पाचव्या स्थानी पांडे जिल्हा परिषद शाळेने क्रमांक पटकावला. सर्व विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छां देण्यात आल्या. तसेच प्रशिक्षक नागनाथ बोळके सर यांचेही विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले त्यांनीही विद्यार्थ्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या.

या सर्व स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी सर्व पालक विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे सहकार्य लाभले. सहकार्याबद्दल सर्व पालकांचे व विद्यार्थ्यांचे मी आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो. असेच सर्वांचे सहकार्य लाभावे हीच अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद.

प्रशिक्षक श्री नागनाथ बोळगे सर ( तलवारबाजी, दांडपट्टा शिवकालीन युद्ध कला)

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 8 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे