Breaking
ब्रेकिंग

महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या विदर्भ प्रमुख म्हणून आकाश सुखदेवे यांची नियुक्ती*

0 3 9 0 8 1

*महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या विदर्भ प्रमुख म्हणून आकाश सुखदेवे यांची नियुक्ती*

वि. उपसंपादक :- पंकज पाटील

पारोळा :- राज्यात महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी रात्रंदिवस कार्य करण्यात येत असून या कार्यात अधिकाधिक भर पडावी यासाठी महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून नियुक्त्या देण्यात येत आहेत. विदर्भात शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करताना दिसून येत आहे आर्थिक तारतम्य यामध्ये दिसत नाही अवकाळी पावसामुळे व प्रशासनच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी बोरगाव तालुका जिल्हा वर्धा येथील आकाश अशोकराव सुखदेवे यांची विदर्भ प्रमुख म्हणून संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व शेतकरी नेते सुनील देवरे यांनी आज रोजी नियुक्तीपत्र दिले.
आपण एक शेतकरी पुत्र असून आपण शेती व शेतकऱ्यांच्या हितासाठी परिसरातील शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळणे कामी काम करण्यासाठी विदर्भ प्रमुख पदावर व विदर्भातील सर्व विभागांकरिता नियुक्त करण्यात येत असल्याचा उल्लेख असून संघटनेला मजबूत करण्यासाठी संघटनेचे ध्येय धोरणे व विचार सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी कामगार वर्ग यांच्यापर्यंत पोहचून शेतकरी हीत जपणार अशी अपेक्षा राष्ट्रीय अध्यक्ष सुनील देवरे यांनी व्यक्त करून पुढील कार्यकारणी पंधरा दिवसाच्या आत घोषित करून संघटनेच्या कार्यालयात पाठवावी असे नमूद केलेले आहे तसेच ज्यांना ज्यांना संपूर्ण महाराष्ट्रात संघटनेत सामील होऊन शेतकऱ्यांसाठी कार्य करायचे असेल अशांनी 9890875238 या नंबरवर संपर्क करावा असे सांगितले.श्री आकाश सुखदेवे यांची विदर्भातील संघटनेचे सर्व कार्यकर्ते सदस्य यांनी निवडीबद्दल अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिलेले आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 8 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे