Breaking
ब्रेकिंग

हिवरे बाजार देशाला नव्हे तर जगाला दिशादर्शक :- ब्रिगेडीअर डिसोझा

0 3 9 0 6 2

हिवरे बाजार देशाला नव्हे तर जगाला दिशादर्शक :- ब्रिगेडीअर डिसोझा

प्रतिनिधी :  दादासाहेब आगळे

वाळकी / प्रतिनिधी :-आज दिनांक १४ एप्रिल २०२५ रोजी एम.आय.सी.& एस.चे ब्रिगेडीअर रुसेल डिसोझा यांनी आदर्श गाव हिवरे बाजारला भेट दिली.त्यांच्यासमवेत कर्नल अमन दत्ता,कर्नल सकेत रावत,कर्नल अभिषेक पटवर्धन,कर्नल बिजॉय,लेफ्टनंट कर्नल सिंह,लेफ्टनंट कर्नल प्रोहित,लेफ्टनंट कर्नल अनुराग ,लेफ्टनंट कर्नल संदेश भवानी,मेजर अहुलीवालीया,मेजर मोहमद रफी,पद्मश्री पोपटराव पवार यांनी विविध विकास कामांची माहिती दिली.भेटीप्रसंगी गावातील विकासकामे व स्वच्छता पाहून डिसोझा हे भारावून गेले.जगात अशा प्रकारचे गाव असू शकते याची प्रचीती प्रत्यक्ष हिवरे बाजार पाहिल्यानंतर आली.याप्रसंगी बोलताना ते म्हणाले हिवरे बाजार भारत देशालाच नव्हे संपूर्ण जगाला दिशादर्शक असे गाव आहे.पद्मश्री डॉ.पोपटराव पवारांच्या नेतृत्वाखाली गावातील विविध विकास कामे झालेली पाहिल्यानंतर आदर्श नेतृत्व असल्यास गाव कसे बदलते यांचे उत्तम उदाहरण हिवरे बाजार आहे.
ब्रिगेडीअर डिसोझा पुढे बोलताना म्हणाले,सध्या जागतिक तापमानवाढीमुळे जगाच्या समोर ज्या समस्या आहेत त्याचे उत्त्तर हिवरे बाजारमध्ये आहे म्हणून देशातील परदेशातील लाखो पर्यटक हिवरे बाजारला भेटी देतात.लोकांचा उत्स्फूर्त सहभाग मिळाला तर जगातील प्रत्येक गाव हे हिवरे बाजारसारखे स्वयंपूर्ण होऊ शकते.
यशवंत माध्यमिक विद्यालयातील एन.सी.सी.विद्यार्थ्यानी त्यांना संचलन करत मानवंदना दिली.पद्मश्री पोपटराव पवार यांनी फेटा बांधून श्रीफळ देऊन सन्मान केला.याप्रसंगी सरपंच विमल ठाणगे,सोसायटीचे चेअरमन छ्बुराव ठाणगे, व्हा चेअरमन रामभाऊ चत्तर, एस.टी. पादिर, रो.ना.पादिर, राजू सहादू ठाणगे,संदीप गुंजाळ तसेच ग्रामस्थ ,पदाधिकारी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 6 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे