श्रीकमलादेवी मंदिराचे पुरातन दगडी स्वरूपातील असलेले मुळ मंदिराचे दर्शन भाविकांना मिळणार

श्रीकमलादेवी मंदिराचे पुरातन दगडी स्वरूपातील असलेले मुळ मंदिराचे दर्शन भाविकांना मिळणार
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. २/ करमाळा येथील श्री कमलादेवी मंदिराचे पुरातन दगडी स्वरूपातील असलेले मुळ मंदिराचे दर्शन आता भाविकांना मिळणार आहे. त्या अनुषंगाने करमाळा येथील श्री जगदंबा कमलादेवी मंदिर ट्रस्टच्या संयोजकाने श्रीकमलादेवी मंदिर जतन व संवर्धन कामास गेल्या वर्षापासून सुरुवात करण्यात आलेली आहे. मंदिर जतन संवर्धनाचे काम प्रगतीपथावर असून भक्तांच्या देणगी रूपी सहकार्यातून या कामास सुरुवात करण्यात आलेली आहे. आज गुरुवार दिनांक ०१ .०५. २०२५ रोजी कै. दादासाहेब बापूराव पुजारी, श्री देवीचामाळ याचे जावाई श्री. सुनील संभाजी निकम, रा. सोलापूर यांचे कडून रु ११,१११/ (आकरा हजार एकशे अकरा रु) ऑन लाईन देणगी प्राप्त झाली आहे. मंदिर समिती तर्फे या निमित्त त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
श्रीकमलादेवी मंदिर जतन संवर्धन काम प्रगती पथावर असल्याकारणाने भाविकांनी सढळ हाताने देणगी देऊन या कामात सहकार्य करण्याचे आव्हान देखील श्री जगदंबा कमलादेवी देवस्थान ट्रस्ट कडून करण्यात आले आहे. तसेच ऑनलाईन देणगी ची सुविधाही उपलब्ध आहे.
*देणगीसाठी संपर्क:- अशोक गाठे व्यवस्थापक मो. नं. ९४०४७०८९२४*