Breaking
ब्रेकिंग

निर्मलनगरचा राहिलेला 25 फुटाचा रस्ता व्हावा रहिवाशांची मागणी

0 3 9 0 5 0

निर्मलनगरचा राहिलेला 25 फुटाचा रस्ता व्हावा रहिवाशांची मागणी

एस डब्ल्यू न्यूज नेटवर्क

नगर-मधील प्रभाग दोन मधील निर्मलनगर या भागातील जवळपास सर्वच रस्ते काँक्रिटीकरण झालेले आहे. फक्त तुळजाभवानी मंदिर ते संत वामनभाऊ कॉलनी मधील 25 फूट लांबीचा रस्ता राहिलेला आहे तो मनपा आयुक्तांनी व आमदार संग्राम जगताप यांनी करून द्यावा अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे .

या ठिकाणचे आजूबाजूचे सर्व रस्ते कॉंक्रिटीकरण झाले आहे. फक्त एवढा 25 फुटाचा रस्ता राहिला आहे आणि हा रस्ता खोलगट असल्याने पावसाळ्यात येथे गुडघ्या इतके पाण्याचे डबके तयार होते. दोन्ही बाजूला उंच रस्ता व हे डबके व पाणी बाहेर जाण्यास त्याला मार्ग नाही,तर इतर वेळेस धूळ व खडीमुळे अपघातही होतात.गाड्या पडतात संपूर्ण निर्मलनगरचे रस्ते चांगले झाले पण एवढाच तुकडा राहिला आहे. याबाबत माझी नगरसेवकाकडेही अनेक वेळा पाठपुरावा केलेला आहे . तरी हा रस्ता आमदार निधीतून किंवा मनापासून महानगरपालिकेने करून द्यावा अशी या भागातील रहिवाशांची मागणी आहे

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 5 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे