Breaking
ब्रेकिंग

समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवण्याचा प्रयत्न आधी कीर्तन मग विवाह

0 3 9 0 2 0

समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवण्याचा प्रयत्न आधी कीर्तन मग विवाह

प्रतिनिधी : – पंकज पाटील

शेवगा :- गेल्या २८ वर्षापासून दरवर्षी शेवगा ता. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित केल्या जाणान्या अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त यंदा गेल्या सात दिवसांपासून धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती. नेवाशाचे हभप वैभव महाराज काळे यांचे बुधवारी कीर्तन झाले. त्यांच्या लग्नसंबंधाबद्दल गावात एका कुटुंबाशी चर्चा सुरु होती. ती चर्चा अंतिम होऊन गाठकऱ्यांनी वैभव महाराजांचा विवाह याच कीर्तन मंडपात लावून दिला.या सप्ताहाची सांगता हभप सुधाकर महाराज वाघ पैठणकर यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर या विवाह सोहळ्याने रविवारी (ता. २६) झाली. तत्पूर्वी हभप वैभव महाराज काळे यांचे बुधवारी (ता. २२) कीर्तन झाले. कीर्तनानंतर गावक-यांसमोर एक प्रस्ताव आला की हभप काळे यांची गावातील सखाराम बुचुडे यांच्या मुलींसोबत विवाह संदर्भाबाबत चर्चा चालू आहे. याबाबत हभप सुधाकर महाराज वाघ यांच्या अध्यक्षतेखाली सप्ताह समिती व गावकऱ्यांसोबत विवाहासंदर्भात चर्चा करण्यात आली. हभप वैभव महाराज यांना या लग्न सोहळ्याबाबत ग्रामस्थांनी विनंती केली. त्यांनी लग्नास होकार दिला. रविवारी काल्याच्या कीर्तनानंतर मंडपातम वारकरी पद्धतीने हा विवाह करण्याचे ठरले. अत्यंत कमी खर्चात व धार्मिक वातावरणात तर हभप वैभव महाराज काले व वधू वैशाली बुचुडे हे दोघे ग्रामस्थांच्या साक्षीने विवाहबद्ध झाले. समाजासमोर एक वेगळा आदर्श हभप वैभय महाराज यांनी निर्माण केला. त्यांचा आदर्श घेऊन सप्ताहानिमित्त असे विवाह सोहळे पार पडावेत.

अशा पद्धतीने विवाह केल्यास समाजापुढे एक आदर्श निर्माण होऊन अनावश्यक खर्चाला आळा बसेल – – हभप सुधाकर महाराज वाघ

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे