कु.शर्मिष्ठा बाळासाहेब डोंगरे ( LLM,NET) हिचे नेट परीक्षेत उज्ज्वल यश
युजीसीने घेतलेल्या नेट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर

कु.शर्मिष्ठा बाळासाहेब डोंगरे ( LLM,NET) हिचे नेट परीक्षेत उज्ज्वल यश
युजीसीने घेतलेल्या नेट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर
राहुरी वृत्तसेवा : जावेद शेख
आय.एल.एस.पुणे येथून एल.एल..बी. चे शिक्षण पूर्ण करुन तिने पवई येथील महाराष्ट्र लाॅ काॅलेज येथे एल.एल.एम. प्रथम श्रेणीत पूर्ण केली. मुळ गाव मांची ता.संगमनेर असून तिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण महात्मा फुले कृषी विद्यापीठातील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात झाले आहे.पुणे आकाशवाणी,अहिल्या नगर एफ एम.केंद्रवर तिने विविध विषयांवर विचार मांडले आहेत.
तिच्या या यशाबद्दल महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डाॅ.साताप्पा खरबडे,संस्थेचे सभापती डाॅ.प्रमोद रसाळ,सचिव डाॅ.महानंद माने ,श्री.महेश घाडगे,डाॅ.उल्हास सुर्वे, डाॅ.ज्ञानेश्वर क्षीरसागर,डाॅ सोपान मगर,श्री.सचिन गाडेकर,मुख्याध्यापक अरूण तुपविहिरे ,जितेंद्र मेटकर,मनोज बावा,संतोष जाधव यांनी अभिनंदन केले.