Breaking
ब्रेकिंग

न्यू लॉ कॉलेजच्या श्रमसंस्कार शिबिराचा उत्साहात समारोप 

0 3 9 0 3 5

न्यू लॉ कॉलेजच्या श्रमसंस्कार शिबिराचा उत्साहात समारोप 

एस डब्ल्यू न्यूज / नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाचे न्यू लॉ कॉलेज अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “युथ फॉर माय भारत अँड युथ फॉर डिजिटल लिटरसी ” या उपक्रमाअंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप न्यू लॉ कॉलेजचे प्राचार्य एम .एम . तांबे सर यांच्या मार्गदर्शनाखाली ११ फेब्रुवारी रोजी तालुक्यातील शिंगवे नाईक या ठिकाणी झाला ,या शिबिर कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड .विश्वासराव आठरे पाटील(सचिव, अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज अहमदनगर) हे होते त्यांनी असे संस्कार पूर्ण शिबिर झाले तर सक्षम तरुण पिढी घडेल असे मत व्यक्त केले .

मुकेश माधवराव मुळे (विश्वस्त, अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज ) यांनी या शिबिराने भविष्यातील वकिलांना कसा कसा फायदा होईल या दृष्टीने महाविद्यालयांनी प्रयत्नशील रहावे असे मत व्यक्त केले .या शिबिराचे स्वागत प्राचार्य डॉ . एम . एम . तांबे यांनी केले .

७ दिवस चाललेल्या या शिबिरात मुलांनी गावात वेगवेगळ्या विषयांवर जनजागृती केली तसेच गावात ठिकठिकाणी वृक्षारोपण केले ,धार्मिक स्थळांची गावातील सर्व शाळांची स्वच्छता केली अवयव दान सर्वश्रेष्ठ दान या विषयावर मुलांनी पथनाट्य सादर केले . हे पथनाटय  रुषीकेश डमाले आणि त्यांची टीम यांनी सुंदररित्या सादर केले . पद्धतीने सात दिवस हे शिबिर अतिशय उत्साह पूर्वक वातावरणात संपले .

स्वयंसेवक ऋषिकेश डमाळे आणि त्यांच्या टीमने अवयदान श्रेष्ठदान यावर पथनाट्य सादर केले . उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून कुमारी कोमल गवळी आणि मनिष पालवे यांना पुरस्कार देण्यात आला . नारायण पाखरे मामा यांचे विशेष सहकार्य लाभले. प्राचार्य डॉ.एम.एम. तांबे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली शिबिर यशस्वीरित्या पार पडले.

या कार्यक्रमासाठी माननीय विश्वास जाधव, गोकुळ बोरुडे, व्यंकटेश जाधव, जावेद सय्यद ,चंद्रकांत काळे ,संतोष कोऱ्हाळे, सिताराम कोरडे, आप्पासाहेब शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.गिरीश हिरडे( कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना) यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु . गायत्री गुंड हिने केले तर आभार प्रा.अनुराधा मते (कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना ) यांनी मांडले .

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 3 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे