Breaking
ब्रेकिंग

रात्रीचे वेळी घरात घुसुन दागिने चोरी करणारा आरोपी कोतवाली पोलीसांकडून जेरबंद

सुमारे दीड लाखाचा ऐवज जप्त

0 3 9 0 5 1

रात्रीचे वेळी घरात घुसुन दागिने चोरी करणारा आरोपी कोतवाली पोलीसांकडून जेरबंद

सुमारे दीड लाखाचा ऐवज जप्त

जिल्हा प्रतिनिधी : महेश चव्हाण

अहिल्यानगर :  दि. ०९/११/२४ रोजी काजल आकाश पंधारे वय २५ वर्षे रा. पोखर्डी यांनी फिर्याद दिली की, तीचे माहेरी इंगळे बस्ती अ.नगर येथे आली असता रात्री च्या वेळी कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराचे आत प्रवेश करून त्यांचे पर्स मधुन सोन्याचे मंगळसुत्र चोरुन घेवून गेला आहे. वगैरे मजकुरच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोस्टे गु.र.नं. ११९५/२०२४ बी.एन.एस २०२३ चे कलम ३०५(अ) प्रमाणे गुन्हा रजिस्टर दाखल करण्यात आला आहे सदर गुन्हयाचा तपास व आरोपीचा शोध घेत असतांना पोलीस निरीक्षक श्री प्रताप दराडे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्ह्यातील आरोपी हा रेल्वेस्टेशन परिसरात चोरीतील दागीने विक्री करण्याकरिता आलेला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने रेल्वेस्टेशन परिसरात गुन्हे शोधपथकासह सापळा लावुन संशयित इसमास ताब्यात
घेवून त्याचेकडे विचारपुस करता त्याने प्रथम उडवाउडविची उत्तरे दिली त्यास अधिक विश्वासात घेवुन चौकशी केली असता त्याने त्याचे नाव संजय ज्ञानदेव धिवर वय.२९ वर्षे रा.इंगळे वस्ती रेल्वे स्टेशन अहिल्यानगर असे सांगुन सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्याची अंगझडती घेता त्याचेकडे घरातून चोरी केलेले दागिने मिळून आले आहेत, तरी सदर गुन्हयाचा पुढील तपास पोहेकॉ शरद वाघ हे करत आहेत.

सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक श्री राकेश ओला सो, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. प्रशांत खैरे सोर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अमोल भारती सो , यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे सो सपोनि योगीता कोकाटे, सफौ. सुनील भिंगारदिवे पोहेकों योगेश भिंगारदिवे, विशाल दळवी, सलिम शेख, विक्रम वाघमारे, राजेंद्र पालवे पोकों अभय कदम, अमोल गाडे, सतिष शिंदे, अतुल काजळे, दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडू यांनी केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 5 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे