मांडळ येथे डॉ. प्रा. वसंत हकारे यांच्या व्याख्यानाचे आयोजन

मांडळ येथे डॉ. प्रा. वसंत हकारे यांच्या व्याख्यानाचे आयोजन
जिल्हा प्रतिनिधी :- पंकज पाटील
जळगाव :- अमळनेर मांडळ येथे ८ रोजी डॉ. वसंत हकारे यांचे व्याख्यान होत आहे.बदलत्या काळात कुटुंबातील नातेसंबंधामध्ये निर्माण होणारे दुरावे, गैरसमज आणि पालकांप्रती कमी होत चाललेली जाणीव यावर ते भाष्य करतील. ‘ज्या बापाने जन्म दिला, त्या बापाची मुलानी कधीच साथ सोडू नयेष्ठ’ या भावनिक आणि वास्तववादी विषयावर ते मनोगत व्यक्त करणार असून, आजच्या
पिढीला विचार करायला भाग पाडणारे मार्गदर्शन मिळणार आहे.
आपुलकी कुटुंबातील नात्यामध्ये समज, आदर आणि वाढविण्यासाठी हे व्याख्यान अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास आयोजकानी व्यक्त केला आहे. कार्यक्रम ८ रोजी, बुधवार, सायंकाळी ७ वाजता, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, मांडळ येथे आयोजित करण्यात आला आहे. तरी उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.



