Breaking
ब्रेकिंग

ॲथलेटिक्स स्पर्धेत आडसूळ पॉलीटेक्निकचा शरद तरटे प्रथम

0 3 9 0 6 1

ॲथलेटिक्स स्पर्धेत आडसूळ पॉलीटेक्निकचा शरद तरटे प्रथम

एस डब्ल्यू न्यूज /   प्रतिनिधी

इंटर इंजीनियरिंग डिप्लोमा स्टुडन्ट स्पोर्ट असोसिएशन द्वारे आयोजित आंतरविभागीय ॲथलेटिक्स स्पर्धेत शरद तरटे याने बाजी मारत प्रथम क्रमांक मिळवला. अथलेटिक्स स्पर्धेत ८००m रनिंग प्रकारात शरद ने हे यश मिळवले. तसेच लॉंग जंप व ट्रिपल जंप या प्रकारात उपविजेतेपद पटकावले, व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र झाला .या स्पर्धेचे आयोजन त्रिमूर्ती डी. फार्मसी कॉलेज, नेवासा फाटा, ता. नेवासा जि. अहिल्यानगर या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते.

या स्पर्धेसाठी पॉलीटेक्निकल इंजिनिअरिंगच्या सर्व विभागप्रमुखांचे विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी प्रोत्साहन लाभले. आडसुळ पॉलिटेक्निकचे प्राचार्य गडाख आर. एस. सर यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. खेळामध्ये हार -जीत होतच राहते. खेळाडूंनी विजयाच्या आनंदा सोबत, हार सुद्धा स्वीकारून पुढील लक्षावर ध्येय केंद्रित करावे. असे सांगून त्यांनी खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवला.

 या स्पर्धेतील विजयी खेळाडूवर, संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. अनिरुद्ध आडसूळ , सचिव सौ. लिनाताई आडसूळ , डायरेक्टर श्री. कृष्णा आडसूळ , खजिनदार मा. श्री. परमेश्वर आडसूळ यांनीहि अभिनंदनाचा वर्षाव केला. या स्पर्धेसाठी आडसुळ पॉलिटेक्निक मधील सहप्रशिक्षक पठाण पी.जे.व प्रशिक्षक निंबाळकर एस. ए. यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभले.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 6 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे