Breaking
ब्रेकिंग

१० व ११ रोजी करिअरच्या संधी याविषयावर मोफत कार्यशाळा

स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन हि काळाची गरज

0 3 9 0 8 0

१० व ११ रोजी करिअरच्या संधी याविषयावर मोफत कार्यशाळा

स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन हि काळाची गरज

वि. उपसंपादक :- पंकज पाटील

जळगाव :-जळगाव जिल्हयातील अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर संचलित पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे दहावी बारावी नंतर विविध क्षेत्रातील करिअरच्या संधी या विषयावर १० व ११ मे रोजी मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.सदर कार्यशाळेत युपीएससी, एमपीएससी, एनडीए, नीट,जेईई व विविध स्पर्धा परीक्षांविषयी उच्च पदस्थ अधिकारी व तज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळा सकाळी ठीक साडे आठ ते साडे बारा यावेळेत राहील. १० मे रोजी आयआरएस विशाल मकवाने अतिरिक्त आयकर आयुक्त नाशिक यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन होईल अध्यक्षस्थानी डॉ डीगंबर महाले तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जयदीप पाटील, निवृत्त डीवायएसपी सुनिल नंदवाळकर, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, डॉ.अतुल सूर्यवंशी व संदीप पाटील यांचे मार्गदर्शन होईल.दिनांक ११ मे रोजी याच वर्षी युपीएससी उत्तीर्ण झालेले योगेश पाटील, आदिवासी विकास विभागाचे सह आयुक्त कपिल पवार, डीवायएसपी विनायक कोते, एरंडोलचे तहसिलदार प्रदीप पाटील, प्रभारी डीवायएसपी केदार बारबोले तसेच २०२३ च्या एमपीएससीत उत्तीर्ण जयकुमार पाटील यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त प्राचार्य डॉ एस आर चौधरी राहतील.
विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शना सोबत विविध स्पर्धांचे व बक्षिसांचे आयोजन करण्यात आले आहे.तरी विद्यार्थी व पालकांनी कार्यशाळेत नाव नोंदणी साठी ८००७५३५०९३/७०२०४३२८१६ या क्रमंकावर संपर्क साधावा.ठिकाण पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय (टाऊन हॉल) अमळनेर.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 8 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे