ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी
ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी
प्रतिनिधी :- पंकज पाटील
चोपडा- येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये मराठा साम्राज्याचे संस्थापक, शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. शाळेच्या समन्वयिका अश्विनी खंडेराव पाटील यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी दिपाली नरेंद्र पाटील, कल्पना संजय बारी, निलेश शशिकांत चव्हाण तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
शाळेतील शिक्षिका सलोनी अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील विविध प्रसंगांची माहिती सांगितली. गंगोत्री साळी, कलश क्षीरसागर, नील सोनवणे, हर्षाली पाटील, काव्या पाटील, हिमानी शिंदे, पुरंदरी करंदीकर, श्रावणी राठोड या विद्यार्थ्यांनी देखील शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील विविध प्रसंगांची सविस्तर माहिती सांगितली. मानस सैंदाणे या विद्यार्थ्याने शिवाजी महाराजांची वेशभूषा परिधान केली होती तर पुरंदरी करंदीकर हिने राजमाता जिजाऊ मासाहेबांची वेशभूषा परिधान केली होती. पुरंदरी करंदीकर या विद्यार्थिनीने जिजाऊ मासाहेबांच्या वेशभूषेत मनोगत व्यक्त केले. अनुष्का सुर्वे आणि नैतिक पाटील विद्यार्थ्यांनी शिवगर्जना सादर केली. शाळेतील कलाशिक्षक शकिल अहमद यांनी आकर्षक फलक रेखाटन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका अश्विनी ढबू यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांचे मार्गदर्शन लाभले तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.