संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलनाचे २२ फेब्रुवारी रोजी नागपूर येथे आयोजन

संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलनाचे २२ फेब्रुवारी रोजी नागपूर येथे आयोजन

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. १०/ संत नामदेव महाराज शिंपी/दर्जी समजाचे राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन २२ फेब्रुवारी रविवार रोजी नागपूर येथे रेशिमबाग या ऐतिहासिक मैदानावर होणार असून, या संमेलनास संपूर्ण भारतातील शिंपी समाजातील सर्व जाती, पोटजाती एकत्र येणार आहेत.
या महासम्मेलनाला पद्मश्री रामकिशोरजी छीपा डेरावाला (राजस्थान), पद्मश्री कन्नुभाई टेलर (गुजरात), प्रवीणभाई दर्जी (गुजरात) तसेच संत मंडळी, राजकीय प्रतिभावान समाजबंधू, भजनी मंडळे यांचा सहभाग होणार आहे.
या कार्यक्रमाला देशपातळीवरील मान्यवर उपस्थित राहणार असून, संत नामदेव विश्व पुरस्काराने सन्मानित केंद्रीय मंत्री श्री नीतिन गडकरी (सडक परिवहन आणि राज्यमार्ग मंत्रालय,भारत सरकार) यांना सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री मा. श्री. शिवराजसिंह चौहान, केंद्रीय कृषि मंत्री मा. श्री. प्रल्हाद जोशी, (खाद्य आणि सार्वजनिक नवीकरणीय ऊर्जा मंत्री, भारत सरकार), खासदार प्रणीतिताई शिंदे, श्री संजयजी नहार (अध्यक्ष सरहद्द संस्था पुणे), खासदार श्री. अनिलजी बोंडे, आमदार श्री. संजयजी खोडके, आमदार सौ. सुलभाताई खोड़के (अमरावती), आमदार रविकुमार राणा (बडनेरा), खासदार सौ. नवनीतजी राणा, चरित्र अभिनेते श्री गोविंदजी नामदेव इं. मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तसेच संतश्रेष्ठ श्री नामदेव महाराजांचे वंशज संत मंडळी, ह.भ.प.जिंतेंद्रनाथ महाराज, स्वामी गोविन्दगिरी महाराज, सप्तखंजरी वादक श्री सत्यपाल महाराज तसेच समाजाचे विविध पदाधिकारी, समाजातील सर्व राष्ट्रीय अध्यक्ष, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर इं. उपस्थित राहणार आहेत.
सदर महिती प्रश्विच महाराष्ट्र मुख संघटक श्री. संतोष मुळे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत चुंबळकर, जिल्हा संघटक श्री रविशेठ वनारसे, सोलापूर जिल्हा प्रसिद्धीप्रमुख अशोक गाठे, सचिव पांडुरंग वडे यांनी सांगितली.



