Breaking
ब्रेकिंग

सरकारने शेतकरी कर्जमाफीसह इतर मागण्या त्वरित मान्य कराव्या अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल-सुरेशराव लांबे पाटील

0 7 6 9 5 1

सरकारने शेतकरी कर्जमाफीसह इतर मागण्या त्वरित मान्य कराव्या अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल- – –  सुरेशराव लांबे पाटील

राहुरी तालुका जावेद शेख

गेली सहा महिन्यापासून शेतकऱ्याचे व दिव्यांगांचे कैवारी मा.मंत्री.बच्चुभाऊ कडू साहेब यांनी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी,दिव्यांगांना सहा हजार मानधन व इतर मागण्यांसाठी विविध प्रकारचे आंदोलने केली परंतु गेंड्याच्या काताडीचे हे झोपेचे सोंग घेतलेले महायुती सरकारला जाग येण्यासाठी बच्चु भाऊंच्या मार्गदर्शनाखाली 24 जुलै रोजी नगर मनमाड रोड राहुरी मार्केट कमिटी समोर चक्काजाम रस्ता रोको आंदोलन करण्यात आले, सरकारने या मागण्या त्वरित मान्य कराव्यात अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल प्रहारचे राहुरी तालुका अध्यक्ष शेतकरी नेते सुरेशराव लांबे पाटील यांनी आंदोलन स्थळ दिला इशारा,

पुढे बोलताना लांबे पाटील यांनी डिझेल,पेट्रोल, रासायनिक खते,कृषी औषधे,पशुखाद्य यांच्या किंमती गगनाला भिडल्या असून त्या तुलनेत शेतीमालाला व जोडधंदा असलेल्या दुधाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहे,यात सुधारणा होण्यासाठी मा.श्री.बच्चुभाऊ कडू साहेब यांनी मोझरी येथे सात दिवस अन्नत्याग उपोषण केले अमरावती ते यवतमाळ १४० किलोमीटर सातबारा कोरा पायी दिंडी,शेतकऱ्यांचा सात बारा उतारा कोरा.पेरणी ते कापणी खर्च एम.आर.इ.जी. एस. अंतर्गत,शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव,दिव्यांगांना सहा हजार पेन्शन,दिव्यांगाला घरकुलचा लाभ,यासह इतरही मागण्यांसाठी राहुरी येथे सर्वपक्षीय आंदोलन यावेळी प्रहार दिव्यांग क्रांती सेनेचे जिल्हा अध्यक्ष मधुकर घाडगे, जिल्हा उपाध्यक्ष अप्पासाहेब ढुस, स्वाभिमानीचे जिल्हा अध्यक्ष रविंद्र मोरे,प्रकाश देढे, रासप चे जिल्हा अध्यक्ष नानासाहेब जुंधारे, आरपीआयचे सचिन भाऊ साळवे,सावता परिषदेचे अशोक तुपे , यांची भाषणे झाली .

यावेळी सलिमभाई शेख, योगेश लबडे, वेनुनाथ आहेर, सचिन साळवे, जुबेर मुसानी, किशोर जाधव सर, संजय देवरे, दत्तात्रय खेमनर , दत्तात्रय येवले , अनिल पेरणे, काशिनाथ दोंड, रायभान धसाळ, शिवाजी झावरे,सरपंच अंतवन गायकवाड, केशव जाधव, कडू शोभा, सोनाली खडके, दावजी भोसले, नानासाहेब खपके, भारत आढाव, कमलेश परदेशी , जलुभाऊ भोसले , रवींद्र भुजाडी, रवींद्र तनपुरे, राजेंद्र घनवट, शिवाजी जाधव उपस्थित होते .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 5 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे