मुख्याधिकारी नवाळे यांच्या संकल्पतून साकारलेली त्रिंबकराज व्याख्यानमाला प्रेरणादायी- आ. हेमंत ओगले

मुख्याधिकारी नवाळे यांच्या संकल्पतून साकारलेली त्रिंबकराज व्याख्यानमाला प्रेरणादायी- आ. हेमंत ओगले
राहुरी अहमदनगर वृत्तसेवा : जावेद शेख
देवळाली प्रवराचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या संकल्पनेतून पार पडलेली त्रिंबकराज व्याख्यानमाला ही प्रेरणादायी असून शहरातील साहित्यिक व सांस्कृतिक वाटचालित व्याख्यानमालेच्या रूपाने एक चांगला पायंडा त्यांनी सुरू केला असल्याचे प्रतिपादन आ.हेमंत ओगले यांनी केले.
देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे श्री त्रिंबकराज मोफत वाचनालयाच्या वतीने समर्थ बाबुराव पाटील महाराज सांस्कृतिक भवन येथे पार पडलेल्या तीन दिवसीय त्रिंबकराज व्याख्यानमालेची सांगता शनिवारी पुणे येथील सचिन पवार यांच्या संताने महाराष्ट्राला काय दिले या व्याख्यानाने झाली.
प्रसंगी आ.ओगले बोलत होते.
यावेळी माजी आ.चंद्रशेखर कदम, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, मुख्याधिकारी विकास नवाळे, माजी नगराध्यक्ष मुरलीधर कदम, साई आदर्श मल्टिस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, वैभव गिरमे, कृष्णा मुसमाडे, दत्ता कडू, नानासाहेब कदम आदिंसह मान्यवर उपस्थित होते.
आ.ओगले म्हणाले की, मुख्याधिकारी नवाळे यांच्या रूपाने देवळाली प्रवराला एक उत्तम अधिकारी मिळाले मात्र आता त्यांची पदोन्नती झाली आहे. मात्र शहराच्या विकासाबरोबर सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्रात त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. राज्यातील जाणकारांचे विचार शहरातील नागरीकांना ऐकवयास मिळावे यासाठी मोठ्या शहराप्रमाणे देवळाली प्रवरात व्याख्यानमाला आयोजित करून चांगला पायंडा पाडला असून ही व्याख्यानमाला दरवर्षी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल गोसावी यांनी केले तर आभार ग्रंथपाल संभाजी वाळके यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी नगरपरिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.