Breaking
ब्रेकिंग

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

0 7 6 9 4 4

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

प्रतिनिधी :- पंकज पाटील

जळगाव : चंदू अण्णा चौफुली येथे आज झालेल्या भीषण अपघाताने प्रशासनाच्या निष्क्रियतेचा पुन्हा एकदा पर्दाफाश झाला आहे. लाल रंगाच्या चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक देत चुराडा केला असून एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे.
या ठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी नागरिकांनी अनेक वेळा केली होती. शाळेमार्फत निवेदन देऊनही आणि 10 दिवसांत काम पूर्ण करण्याचे आश्वासन मिळूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही, असा गंभीर आरोप स्थानिकांनी केला आहे.
चौफुलीवर कोणतेही गतिरोधक नसल्यामुळे वाहनचालक भरधाव वेगाने धावतात. सकाळ-संध्याकाळ मोठ्या प्रमाणात नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक व मॉर्निंग वॉक करणारे येथे येत असताना देखील प्रशासनाने दुर्लक्ष केले.
“अपघात होणारच” अशी भीती नागरिकांनी वारंवार व्यक्त केली होती. अखेर आज ती भीती खरी ठरली. आता प्रश्न असा उपस्थित होत आहे की, एखाद्याचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?
प्रा. डॉ. संदीप पाटील यांनीही या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. प्रभाग क्रमांक 9 समस्या ग्रुपवर या घटनेबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत असून नागरिकांनी त्वरित गतिरोधक बसविणे व जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे