अमळनेर तालुक्यातील जवखेडे येथे माता पालक मेळावा व हळदी कुंकू साजरा
अमळनेर तालुक्यातील जवखेडे येथे माता पालक मेळावा व हळदी कुंकू साजरा
प्रतिनिधी :- पंकज पाटील
अमळनेर : तालुक्यातील जि प प्राथ शाळा जवखेडे येथे माता – पालक मेळावा व हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा कविता प्रफुल्ल पाटील तर प्रमुख पाहूण्या म्हणून जवखेडे गावाच्या प्रथम नागरीक जयश्री कैलास माळी या उपस्थित होत्या. या कार्यक्रमास माता – पालकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. सर्व महिला भगिनींनी मराठीत, इंग्रजीत , अहिराणीत उखाणे घेतले. तसेच शाळेच्या माहिला शिक्षक भगिनींनी यावेळी सर्व महिलांना हळदी कुंकू देऊन वाण वाटले. शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका रत्नप्रभा साळुंखे यांनी माता पालकांना मार्गदर्शन केले. अर्चना बागुल यांनी माता पालकांनी आपल्या शाळेत पाल्यास उपस्थित ठेवण्याचे वाण मागितले. कारण मुलांची उपस्थिती हिच गुणवत्ता वाढविण्यास मदत करते हे पटवून सांगितले. काही महिला भगिनींनी गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुनिता पाटील यांनी तर आभार प्रदर्शन रेखा पाटील यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक छगन पाटील यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुकेश पाटील , माधवराव ठाकरे , अनिता बोरसे तसेच सर्व सजावट करणाऱ्या शारदा मुकेश पाटील यांनी सहकार्य केले.