श्री. योगेश (आप्पा) महाजन यांचा क्षत्रिय काच माळी समाजातर्फे सत्कार
मढी येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या योगदानाबद्दल गौरव

श्री. योगेश (आप्पा) महाजन यांचा क्षत्रिय काच माळी समाजातर्फे सत्कार
मढी येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या योगदानाबद्दल गौरव
वि. उपसंपादक :- पंकज पाटील
अमळनेर :-अमळनेर येथील क्षत्रिय काच माळी समाजाच्या वतीने, भारतीय जनता पार्टी अमळनेर शहर अध्यक्ष श्री. योगेश (आप्पा) महाजन यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. त्यांच्या उदार देणगीतून मढी येथील क्षत्रिय काच माळी समाज संस्थानात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, श्री. महाजन यांच्या हस्ते या यंत्रणेचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमात समाजाच्या वतीने समाज अध्यक्ष मा. श्री. मनोहर महाजन सर यांनी श्री. योगेश महाजन यांचा विशेष सत्कार करत त्यांनी समाजासाठी केलेल्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
तसेच भारतीय जनता पार्टी अमळनेर शहर अध्यक्षपदाची जबाबदारी माळी समाजाला दिल्याबद्दल व समाजातील घटकांना नेतृत्वाची संधी प्रदान केल्याबद्दल, आम्ही जिल्ह्याचे लोकप्रिय नेते व महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री मा.ना. गिरीशभाऊ महाजन आणि जळगाव लोकसभा क्षेत्राच्या मा.खा. स्मिताताई वाघ यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. सामाजिक समरसता व सर्वसमावेशक नेतृत्व या मूल्यांना यामुळे अधिक बळ मिळाले आहे आपल्या या विश्वासामुळे माळी समाजाच्या युवा नेतृत्वाला नवीन दिशा मिळेल आणि समाजहितासाठी अधिक कार्य करण्याची प्रेरणा मिळेल, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.
मनोगत व्यक्त करताना श्री. योगेश महाजन म्हणाले :
“समाज हा माझ्यासाठी सर्वप्रथम आहे शहराध्यक्ष पद हे माझे वैयक्तिक नसून, माळी समाज व सर्व समाजबांधवांचे आहे. समाज संघटन व पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन. कार्यक्रमास क्षत्रिय काच माळी समाज पंच मंडळाचे अॅड. सुदाम माळी, श्री. गणेश महाजन सर, श्री. कैलास महाजन, श्री. गंगाराम महाजन, श्री. गुलाब बापू, श्री. पांडुरंग माळी, श्री. बी.आर. महाजन सर, श्री. ज्ञानेश्वर महाजन, श्री. रमेश माळी, श्री. मनोहर माळी, श्री. अशोक महाजन, श्री. राजेंद्र महाजन, श्री. रविंद्र माळी, प्रा. डॉ. सुभाष महाजन, नगरसेवक मा. भाऊसाहेब महाजन, श्री. हिरालाल महाजन, श्री. जितेंद्र सैंदाणे तसेच इतर अनेक समाजबांधव उपस्थित होते.