ब्रेकिंग
पिंपळे रोडवर निकृष्ट डांबरीकरणाच्या कामामुळे नागरीक त्रस्त;
0
8
6
5
6
3

पिंपळे रोडवर निकृष्ट डांबरीकरणाच्या कामामुळे नागरीक त्रस्त;*
जिल्हा प्रतिनिधी :- पंकज पाटील
अमळनेर :- शहरातील मुख्य रस्ता असलेल्या पिंपळे रोडवर निकृष्ट डांबरीकरणाच्या कामामुळे दोन महिन्यापासून भला मोठा खड्डा पडलेला असताना तो बुजवण्यासाठी पालिकेच्या बांधकाम विभागाने ८ दिवसापूर्वी चक्क दगड व विटांचा मलबा त्यात टाकल्यामुळे वाहनधारकांची डोकेदुखी वाढली असून मोठ्या दगड व विटांच्या मलब्यावरून दुचाकीचे चाक घसरून रोज छोटे- मोठे अपघात होत असून याकडे प्रभागातील नगरसेवक व पालिकेचे अधिकारी यांनी पूर्णतः दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
0
8
6
5
6
3



