श्री राम देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्ष पदी शिवहरी म्हस्के यांची बहुमताने निवड…
श्री राम देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्ष पदी शिवहरी म्हस्के यांची बहुमताने निवड…
एस डब्ल्यु न्यूज / संपादक : संजय वायकर
नगर तालुक्यातील दहिगाव येथील ऐतिहासिक तिर्थक्षेत्र ‘क”वर्ग श्री राम देवस्थानच्या पब्लिक ट्रस्टच्या अध्यक्ष पदी शिवहरी म्हस्के यांची बहुमताने निवड झाली आहे . तर उपअध्यक्ष पदी मोहन निमसे, कोषाध्यक्ष पदी बाबासाहेब बनकर, सरचिटणीस पदी कचरू गायकवाड, यांची बहुमताने निवड झाली आहे.
नाना गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली राजेंद्र हंबडेॅ यांच्या उपस्थितीत हि निवड करण्यात आली न्यासाचे वंशपरंपरा विश्वस्त अनंत द्रविड,रघुवीर द्रविड, उपस्थित होते.ट्रस्ट देवस्थानचे एकुण विश्वस्त अकरा आहे. नागेश वाघ, मधुकर म्हस्के,आजिनाथ म्हस्के, गौतम हंबडेॅ, संजय सावंत असे विश्वस्त आहे. या वेळी माजी सरपंच नामदेव म्हस्के, माजी अध्यक्ष ॲड पोपट म्हस्के, खरेदी विक्री संघ मा.संचालक जयवंत शिंदे, ग्रामपंचायत सदस्य अमिर शेख, प्रा. रवींद्र हंबडेॅ, ग्रामपंचायत सदस्य जावेद शेख, ट्रस्ट माजी अध्यक्ष राजेंद्र हंबडेॅ,माजी सरपंच सुनिल म्हस्के, अंबादास म्हस्के, सुदाम बनकर, सेवा सोसायटी चेरमन दत्तात्रय बनकर, विश्वनाथ शिंदे, ग्रामपंचायत सदस्य राहुल पोटरे, गणेश हिंगे, एकनाथ आगळे,मोहंमद सय्यद, गोरख म्हस्के,विनायक वाघ,आदि ग्रामस्थ उपस्थित होते.
सदर निवडीने ग्रामस्थांकडून नविन कार्यकारिणीचे स्वागत करण्यात आले असून सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या .