Breaking
ब्रेकिंग

श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने श्री गुरू नानक देव जयंती व त्रिपुरारी पोर्णिमा निमित्त भव्य दिव्य दीपोत्सव संपन्न

0 3 9 0 8 3

श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने श्री गुरू नानक देव जयंती व त्रिपुरारी पोर्णिमा निमित्त भव्य दिव्य दीपोत्सव संपन्न

२४ वर्षा पासून अखंड उपक्रम — देविदास शर्मा

खामगाव / प्रतिनिधी

स्थानिक सतिफैल भागातील श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा श्री गुरू नानक देव जयंती व त्रिपुरारी कार्तिक पौर्णिमा निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार दि .१५ नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते.

मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास ऊर्फ मुन्ना भाऊ शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली मागील २४ वर्षा पासून मंडळाच्या माध्यमातून धार्मिक व अनेक सामाजिक उपक्रम निस्वार्थ अखंडपणे मुख मे हो राम नाम,राम सेवा हात मे हे ध्येय घेऊन सुरू आहेत या मध्ये आज त्रिपुरारी पोर्णिमा या दिवशी भगवान शंकराने त्रैलोक्याला त्रास देणाऱ्या त्रिपुर राक्षसाची तीन पुरे जाळून त्याला ठार केले म्हणून या पोर्णिमेला त्रिपुरी किंवा त्रिपुरारी पोर्णिमा असे म्हणतात या दिवशी रात्री घरात, घराबाहेर, देवळात, शिवालयात, गंगेच्या तिरावर दिवे लावतात व दिपदान करावे, गंगा स्नान करावे आणि कार्तिक स्वामी चे दर्शन घ्यावे असा विधी आहे त्रिपुरारी पोर्णिमा चे औचित्य साधुन
दिं १५-११-२०२४ शुक्रवार
रोजी सकाळी १० वा श्री गुरू नानक देव यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .

संध्याकाळी ६ वा ओंकारेश्वर मंदिर, मठ येथे महाआरती करून भव्य-दिव्य दीपोत्सव ५००० दिवे लावुन साजरा करण्यात आला सर्व प्रथम देविदास शर्मा यांच्या शुभहस्ते महाआरती करून दीपोत्सव साजरा करण्यात आला .

याप्रसंगी लक्ष्मणराव गाडे, मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास शर्मा.विनोद सुकाळे, दिलीप झापर्डे.अरूण कडवकर, सागर चुंबळकर, दिनेश डोंगरकर,रामदास ढोले, ज्ञानेश्वर सुकाळे,स्वराज सुकाळे,कृष्णा सुकाळे,नंदुभाऊ बरडिया,विक्की देशमुख, सुभाष बावस्कर, सुरेश दुधाळ, प्रतिक पवार, अमन गरड, अथर्व चोथवे, अभिषेक डोंगरकर,आदित्य इंगळे,कृष्णा जगताप,विजय जंगम, जितेंद्र इंगळे, सोहम महाडिक,राजु इंगळे,आशाबाई अंधारे.पार्वता सुकाळे, जया सुकाळे,शकुंतला ढवळे. जयश्री झापर्डे. संगिता वाघोळे,प्रमिलाबाई शिंदे,जान्हवी डोंगरकर,जान्हवी शर्मा,ऊषा शर्मा, किर्ती शर्मा,शारदा नेमाडे,सुनिता इंगळे,निता ढेकळे, सुनिता बोचरे,संगिता वानखडे,पायल वानखेडे,गौरी वानखडे, ममता वानखडे, शितल पाल, पायल बरडिया,अंजली पवार तसेच शिवाजी नगर. सतिफैल भागातील शेकडो महिला पुरूषांची उपस्थिती होती अशी माहिती श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने देण्यात आली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 8 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे